शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२२ कुटुंबीयांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:39 IST

राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेलसुरा येथील प्रकार : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सेलसुरा येथील २२ घरांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. संबंधीत शासकीय यंत्रणेद्वारे या घरांचे मुल्यांकन करून मोबदलाही देण्यात आला आहे. परंतु, देण्यात आलेला मोबदला अतिशय अल्प असून नवीन घर बांधण्यासाठी सध्या जागाच उपलब्ध होत नसल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने सर्व्हे क्र. ४३ मध्ये एकूण ८४ भुखंड पाडले आहे. त्यापैकी ४० प्लॉटचा वाटप ग्रा.पं. प्रशासनाने केला आहे. परंतु, ४२ प्लॉट पैकी काही प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले नाही त्या ठिकाणी आम्हाला जागा देत घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर ललिता कांबळे, हरिदास चुरागळे, भगवान गवळी, अमोल केरोदे, नारायण मरापे, लिला कांबळे, गजानन प्रधान, संजय तागडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग