शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

२२ उमेदवारांची दांडी तर १,३५८ उमेदवारांनी दिली कोतवाल होण्यासाठी परीक्षा

By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 16:41 IST

पाच उपकेंद्रांवरून झाली शांततेत परीक्षा

वर्धा : जिल्ह्यातील कोतवालांच्या ८९ पदांसाठी मंगळवारी वर्धा शहरातील पाच उपकेंद्रांवरून प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यात आली. या पाचही उपकेंद्रांवर शांततेत कोतवाल पदभरतीची परीक्षा पार पडली असून संबंधित परीक्षेला २२ उमेदवारांची अनुपस्थिती होती. तर १ हजार ३८० उमेदवारांपैकी तब्बल १ हजार ३५८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा ही ‘एमपीएससी’च्या धर्तीवर आणि पारदर्शीच व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले होते. मंगळवारी दुपारी १२ ते १ या वेळेत यशवंत महाविद्यालय वर्धा, न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज वर्धा, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा आणि गो. से. वाणिज्य महाविद्यालय वर्धा या उपकेंद्रावरील एकूण ६४ खोल्यांतून ही परीक्षा शांततेत पार पडली. संबंधित परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचही परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवाय पाच परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक असे पाच उपकेंद्रप्रमुख, २१ पर्यवेक्षक व अतिरिक्त पर्यवेक्षक, ६३ समवेक्षक व अतिरिक्त समवेक्षक, १० लिपिक, १५ शिपाई, आठ वाहनचालक आणि १० पोलिस कर्मचाऱ्यांनी सेवा दिली.

पॉईंटकुठल्या केंद्रावरून किती उमेदवारांनी दिली परीक्षा

* यशवंत महाविद्यालय, वर्धा : २६०* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ४२३* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : २३६* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ३५६* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ८३कुठल्या केंद्रावरील किती उमेदवारांनी परीक्षेला दाखविली पाठ* यशवंत महाविद्यालय, वर्धा : ०४* न्यू इंग्लिश हायस्कूल, वर्धा : ०९* न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, वर्धा : ०४* जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा : ०४* गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा : ०१२४ तासांच्या आत तपासल्या उत्तरपत्रिका

मंगळवारी पाच परीक्षा उपकेंद्रांवरून कोतवाल पदभरती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असलेली परीक्षा घेण्यात आली. दुपारी १२ ते १ या वेळेत ही परीक्षा झाली असली तरी त्यानंतर लगेच उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जिल्हा कचेरीत करण्यात आली. संबंधित परीक्षेचा निकाल मंगळवारीच जाहीर करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाचा असला तरी वृत्तलिहिस्तोवर म्हणजेच दुपारी ४.१७ वाजेपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता.

टॅग्स :examपरीक्षाwardha-acवर्धा