शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

214 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट आहे तयार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकमेकांना सहकार्य केल्यास आपत्तीचा सामना सहज करता येईल, असा आशावाद निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी व्यक्त केला आहे.  आपत्ती निवारण करण्यासाठी आठही तालुकास्तरावर तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा चांगला मान्सून बरसणार असल्याच्या हवामान विभागाच्या भाकिताने शेतकरी राजा खूश झाला आहे. खरिपाच्या तयारीला तो लागला आहे. महाराष्ट्रात तीन दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर आपत्ती निवारण कक्ष स्थापन करुन बचाव पथके नेमण्यात आली आहे. २१४ गावांना पुराचा धोका असून लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबरी बोट यासह इतर साहित्यही अपडेट करण्यात आल्याची माहिती आहे. पावसाळा सुरु होताच कोठे पूर येऊन गावाला वेढा पडतो, गावातील पूल वाहून जातो, दरडी कोसळतात, रेल्वे मार्गावर अडथळे येतात. नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होते. आपत्तीत सर्व विभागांनी एकमेकांना सहकार्य केल्यास आपत्तीचा सामना सहज करता येईल, असा आशावाद निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी व्यक्त केला आहे. आपत्ती निवारण करण्यासाठी आठही तालुकास्तरावर तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. बचाव पथकाला प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती आहे. आपत्ती आल्यास सामाेरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

वीज रोधक यंत्रणाही सज्ज-   जिल्ह्यातील तालुकास्तरावर वीज रोधक यंत्रणेच्या माध्यमातून वीज पडणार की नाही, याची तपासणी केली जाते. -  पावसाळ्याच्या दिवसात वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे तालुकास्तरावर वीज रोधक यंत्रणाही सज्ज झाली आहे.

या ठिकाणी येतो पूर-  पावसाळ्यात जिल्ह्यातील धाम नदी, बोर नदी, भदाडी नदी, यशोदा नदी, शेर नदी, नाला, वाघाडी नाला, पंचधारा धरण, वर्धा नदी, कड नदी, वणा नदी, पोथरा नदी आदींसह नाल्यांना पूर येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती आहे.

बचाव साहित्य खरेदी करणे सुरू तालुकास्तरावर रबरी बोट, फायबर बोट, लाईफ बॉयज, लाईफ जॅकेट्स, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, हेल्मेट विथ टॉर्च, आदी विविध बचाव साहित्याचे वाटप तालुकास्तरावरील बचाव पथकांना देण्यात आले असून उर्वरित बचाव साहित्य खरेदी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आहे. 

तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्टआपत्तीपासून वाचण्यासाठी तसेच आपत्ती आल्यास तत्काळ मदतकार्य पोहचविण्यासाठी तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट ठेवण्यात आले आहे.  तशा सूचनाही तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :floodपूर