शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

२१ युनिटचे १६६ तर १८ युनिटचे ३३२ रुपये देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:46 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जावईशोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यातील पाणी वापराचे देयक देताना याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी (मेघे) येथील एका ग्राहकाला २१ युनिटचे ११६ रुपये तर दुसऱ्या ग्राहकाला १८ युनिटचे चक्क ३३२ रुपयांचे देयक दिले आहे. या प्रकरणी तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.सविस्त वृत्त असे की, सिंदी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या अरुण कुंभारे यांना १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत १८ युनिट पाण्याचा वापर केल्याचे पुढे करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३३२ रुपयांचे देयक देण्यात आले. तर याच गावातील रहिवासी असलेल्या विजय नामदेव मसराम यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आॅक्टोबर महिन्याच्या २१ युनिट पाण्याच्या वापरासाठी १६६ रुपयांचे देयक दिले आहे. सदर दोन्ही देयकांवर जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता विलास उमळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाण्याचे देयक देताना काहीतरी त्रुटी झाली असावी असे लक्षात येताच अरुण कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठून सदर समस्या अधिकाऱ्यांना सांगितली. परंतु, त्यांनाच दोषीच्या कठगड्यात उभे करून असभ्यतेची वागणून देण्यात आली.शिवाय उडवा-उडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आल्याच्या आशयाची तक्रार कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.देयकांमध्ये अनावधानाने त्रुट्या होतात. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणी असावा. देयकांमधील त्रुट्या दुरूस्तीची जबाबदारी गायधने यांच्याकडे देण्यात आली आहे. देयकांमधील त्रुट्या त्यांच्या निदर्शनास ग्राहकांनी आणून द्याव्या. तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल. कुण्या ग्राहकाला असभ्यतेची वागणूक देणे ही बाब निंदनियच आहे.- विलास उमाळे, उपविभागीय अभियंता, म. जी. प्रा. वर्धा.