शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

20 हजार टेस्टमुळे आठ दिवसांत सापडले 2,654 नवीन कोविड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४९५ इतकी रेकॉर्ड ब्रेक नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात २ हजार ६५४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असली तरी याच आठ दिवसांच्या काळात तब्बल २ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. 

ठळक मुद्देनागरिकांनो सावधान! वर्ध्यानंतर हिंगणघाट होऊ पाहतोय कोविडचा मोठा ‘हॉटस्पॉट’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १९ हजार ९१२ व्यक्तींनी कोविड चाचणी केली असता २ हजार ६५४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  १ ते ८ एप्रिल या कालावधीत सापडलेल्या या नवीन कोविड बाधितांमध्ये तब्बल १ हजार ३५० रुग्ण वर्धा तालुक्यातील तर ४६९ कोविड बाधित हिंगणघाट तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास वर्ध्यानंतर आता हिंगणघाट तालुका कोविड हॉटस्पॉट होऊ पाहत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४९५ इतकी रेकॉर्ड ब्रेक नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात २ हजार ६५४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असली तरी याच आठ दिवसांच्या काळात तब्बल २ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ३९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोविड बाधितांसह कोविड मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित आहे. असे असले तरी त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त कोविड बाधित गृहअलगीकरणात आहेत.

३९ व्यक्तींचा घेतला कोरोनाने बळीजिल्ह्यातील कोविड मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ दिवसांत तब्बल ३९ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. तर शुक्रवारी तब्बल सहा व्यक्तींचा कोविडने बळी घेतला आहे.

२ हजार ८९ रुग्णांचा कोविडवर विजयमागील आठ दिवसांत एकूण २ हजार ८९ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. १ एप्रिलला ३३०, २ एप्रिलला ३२६, ३ एप्रिलला १९८, ४ एप्रिलला २४९, ५ एप्रिलला ३०८, ६ एप्रिलला २५१, ७ एप्रिलला २२२ तर ८ एप्रिलला २०५ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या