शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:57 IST

आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : आंबोडा व पिंपळगाव येथे शेतकऱ्यांना सातबारा वाटप

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.आंबोडा येथे आंबोडा व पिंपळगाव येथील शेकऱ्यांच्या शेती भोगवट दोन मधून एकमध्ये करून सातबारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित होता. यावेळी ते बोलत होेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भैय्यासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं.स. सभापती विद्या भुजाडे, सदस्य दुर्गा मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी वझलकर, तलाठी ठमके, मिलिंद भेंडे, राहुल चोपडा, सचिन कुऱ्हाडकर, राजू गोरडे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.आंबोडा व पिंपळगाव येथील ४५० शेतकऱ्यांचे भोगवट दोनचे वर्ग एकमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १०० सातबाºयाचे वाटप करण्यात आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. खा. तडस म्हणाले की, आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकºयांच्या शेती भोगवट दोन मधून एक मध्ये करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्वी येथील कार्यक्रमात या गावातील शेतकºयांसह भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही समस्या त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आपले आश्वासन पाळले व शेतकऱ्यांची मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन अंकुश साठोणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विना साठोणे यांनी केले तर आभार केशव निखार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुनील साठोणे, भाष्कर साठोणे, सुरेश गवते, केशव चौधरी, सुधाकर शेळके, जगन पिसे, संदीप साठोणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.