शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

१९ व्या वर्षीही झाले सुरगावात रंगाविना धुलिवंदन

By admin | Updated: March 26, 2016 01:55 IST

संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक प्राप्त व १९ वर्षांची परंपरा जोपासत सुरगाव येथील रंगमुक्त अभिनव धुलिवंदन व संत विचार ज्ञान यज्ञ ...

तीन दिवस विविध कार्यक्रम : गावातील चिमुकल्यांसह ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गतवर्षीच्या तुलनेत उपस्थिती वाढलीसेलू : संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक प्राप्त व १९ वर्षांची परंपरा जोपासत सुरगाव येथील रंगमुक्त अभिनव धुलिवंदन व संत विचार ज्ञान यज्ञ त्रिदिवशीय कार्यक्रमााचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमाचा गुरुवारी समारोप झाला. सुरगाव येथे गत १९ वर्षांपासून छोट्यांसह ज्येष्ठापर्यंत कुणीही धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळत नाही. गावात लाकडे जाळून होळी न पेटविता ग्रामसफाईतून निघणाऱ्या कचऱ्याची होळी केल्या जाते. सुरगाव येथील ग्रामस्थ व श्री संत नानाजी महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने आयोजित हा कार्यक्रम यंदाही संपन्न झाला. पंचक्रोशीतीलच नव्हे तर विदर्भाच्या विविध गावातून पाहूणे हा आनंद सोहळा पाहण्यासाठी सुरगावात दाखल झाले होते. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी निघालेली नामधून (मिरवणूक) डोळ्याची पारणे फेडणारी होती. डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले गुरुदेव प्रेमी शिस्तबद्ध रांगेत चिमुकले, महिला-पुरुष सारेच स्वच्छ वस्त्र परिधान करून नामधूनमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रसंताच्या खड्या आवाजातील भजने, सर्व संताचा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. प्रत्येकांच्या घरासमोर संताच्या प्रतिमा सजविलेल्या आसनावर होत्या. तोरण, पतका गेट कमानी सर्वांच्या स्वागतासाठी उभारल्या गेल्या होत्या. नामधून कार्यक्रम स्थळी उभारलेल्या मंडपात पोहचल्यावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तखंजेरी वादक भाऊ थुटे तर अतिथी म्हणून ठाणेदार संतोष बाकल, डॉ. जाजू, मोहन अग्रवाल, सुनील बुरांडे, रवी खडतकर, अवचित सयाम, बा.या. वागदरकर, अ‍ॅड. वैभव वैद्य, अनिल चौधरी, सचिन देवगीरकर, मुरलीधर बेलखोडे, गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस असलेल्या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात अनेक मान्यवरांनी प्रबोधन व विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या अभिनव धुलिवंदनाचे मुख्य प्रेरक व सप्तखंजेरी वादक प्रवीण महाराज देशमुख यांनी केले. याप्रसंगी दररोजच्या ज्ञान प्रार्थनेतील उपासकांना विविध क्षेत्रात शासकीय नोकरी मिळली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला तर गावातील गरिबांना वस्त्रदानाचा व विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही पार पडला.कार्यक्रमाचे संचालन प्रियंका देशमुख व प्राची वानखेडे यांनी केले. यशस्वीतेकरिता सोनाली ठाकरे, रूपाली ठाकरे, कांचन मेहता, प्रणाली कोरडे, कविता मेश्राम, प्राजक्ता ठाकरे, प्राजक्ता चनेकर, ममता राऊत यांच्यासह गावातील युवक, महिला, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)