शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जिल्ह्यातील 1.98 लाख व्यक्तींना मिळणार बूस्टर डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील सातव्या दिवशी पुन्हा एकदा कोविड चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी जिल्ह्यावर ओमायक्रॉनचे संकट कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात ओमायक्रॉनचा प्रसार हळूहळू वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या ओमायक्रॉन या प्रकाराला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने वयोवृद्ध व हेल्थ केअर वर्करला लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या याच घोषणेमुळे आता जिल्ह्यातील १.९८ लाख वयोवृद्ध आणि हेल्थ केअर वर्करला कोविड लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. वयोवृद्धांना प्रिकॉशन डोस (क्षमता माता), तर हेल्थ केअर वर्करला बूस्टर डोस १० जानेवारीपासून दिला जाणार आहे.विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात ७५ हून अधिक व्यक्ती परतले असले, तरी या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी विदेशवारी करून परतणाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. शिवाय विलगीकरण काळातील सातव्या दिवशी पुन्हा एकदा कोविड चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी जिल्ह्यावर ओमायक्रॉनचे संकट कायम आहे. अशातच पंतप्रधानांनी केलेली घोषणा ही कोविडशी लढा देण्यासाठी फायद्याचीच ठरणारी आहे. नवीन लाभार्थ्यांना लस देण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.

सहा महिन्यांचे अंतर, तर मिळणार बूस्टर डोस-    ज्या हेल्थ केअर वर्कर आणि वयोवृद्धांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला अशाच हेल्थ केअर वर्कर व वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींनाच १० जानेवारीपासून कोविड लसीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

१.८० लाख वयोवृद्धांनी घेतला लसीचा पहिला डोस-    ६० पेक्षा जास्त वयोगटातील जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ५०० व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले. असे असले तरी आतापर्यंत याच वयोगटातील १ लाख  ८० हजार ९५७ व्यक्तींनी लसीचा पहिला, तर १ लाख २५ हजार ३८१ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

१५ ते १८ वयोगटातील ८० हजार व्यक्तींना मिळेल व्हॅक्सिन-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटांतील व्यक्तींनाही कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे १५ ते १८ वयोगटांतील जिल्ह्यातील सुमारे ८० हजार व्यक्तींना कोविडची लस मिळणार आहे.

१७,८१८ हेल्थ केअर वर्करने घेतला लसीचा पहिला डोस-    जिल्ह्यातील १७ हजार ५४० हेल्थ केअर वर्करला कोविडची लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले, तर आतापर्यंत १७ हजार ८१८हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला, तर १६ हजार ३४९ हेल्थ केअर वर्करने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या