शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रहारच्या ‘१८७ व्या अ‍ॅडव्हेंचर कॅम्प’ला प्रारंभ

By admin | Updated: April 26, 2017 00:27 IST

प्रहार संस्थेच्यावतीने पाच दिवसीय १८७ व्या प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

हुतात्मा स्मारक परिसरात आयोजन : शिबिरात ५५ मुला-मुलींचा सहभाग वर्धा : प्रहार संस्थेच्यावतीने पाच दिवसीय १८७ व्या प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरातील शिबिरास मंगळवारी प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कॉऊटचे राज्य मुख्यालय आयुक्त रामकुमार जयस्वाल तर अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते इमरान राही, प्रभाकर पुसदकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे उपाध्यक्ष प्रदीप दाते, शिबिर प्रमुख तथा प्रहारचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर आदी उपस्थित होते. शिबिरात जिल्ह्यातील निवडक ५५ मुला-मुलींचा सहभाग आहे. आज देशासमोर भ्रष्टाचार, गरीबी जातीवाद, हिंसा व आंतकवादासारख्या समस्या उभ्या आहेत. सदर समस्यांवर मात करण्यासाठी सशक्त व सुजान नागरिकांची फळी निर्माण होण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून प्रहार संस्थेच्या साहस व सैनिकी प्रशिक्षणातून शालेय विद्यार्थी व युवकांत निर्भयता, जागरुकता, शिस्त, राष्ट्रप्रेम व नैतिक मूल्य निर्माण होत आहे, असे मत राही यांनी व्यक्त केले. पुसदकर यांनी प्रहार संस्था बालकांवर योग्य संस्कार करीत असून आपल्या देशाची खरी संपत्ती निर्माण करीत आहे, असे सांगितले. दाते यांनी प्रहारच्या प्रशिक्षणातून सैनिकी मानसिकता समाजात निर्माण होत असून ही बाब प्रशंसनीय असल्याचे सांगितले. प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचे उद्घाटन विविध अडथळा पार प्रशिक्षणाने करण्यात आले. यात ‘बर्मा व्रिज’ हे आॅब्स्टकल शिबिरार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरलेले आहे. ‘हम युवा प्रहारी, हम बढे चलो, बढे चलो...’ या देशभक्तीपर गीताने प्रहारींनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रहार संस्थेच्या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन सैन्य दलात सामील झालेले सैनिक सुप्रभात बावनगडे आणि तटरक्षक दलाचे जवान चेतन खडसे यांचा उपस्ति मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून गुजरकर यांनी प्रहार संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालन संतोष तुरक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मानले. कार्यक्रम तथा शिबिराच्या यशस्वीतेकरिता अश्विनी घोडखांदे, वैशाली गुजरकर, वृशाली गुजरकर, साकीब पठाण यांच्यासह प्रहारचे स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)