शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १८३० रुग्णांची नोंद

By admin | Updated: August 26, 2014 23:38 IST

पावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे.

वातावरणातील बदल : बळावताहेत श्वसनाचे आजार; रुग्णालयात वाढतेय गर्दीरूपेश खैरी - वर्धापावसाची दडी, पाऱ्याची न होणारी घसरण, शिवाय जिल्ह्याच्या वातावरणात दिवसागणिक होत असलेली प्रदुषणाची वाढ यामुळे जिल्ह्यात श्वसनाचे आजार वाढत असल्याचे समोर येत आहे. ही वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गत एक महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात या श्वसनाचे आजार जडलेल्या एकूण एक हजार ८३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात एक हजार तीन पुरूष व ७२७ महिलांचा समावेश आहे. निसर्गाच्या कोपामुळे केवळ शेती वा त्याच्याशी निगडीत असलेल्या घटकावर विपरीत परिणाम होतो असेच नाही तर या कोपाचा परिणाम सर्वांवरच होत असल्याचे रुग्णालयात वाढत असलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. या महिनाभरात रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, हगणव, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. या तुलनेत श्वसनाचे आजार असलेले रुग्ण अधिक असल्याचे समोर येत आहे. या रुग्णांवर उपचार शक्य आहे; मात्र वाढत असलेले प्रमाण चिंतेचा विषय आहे. वातवारणात सध्या झालेला बदल हेच एक कारण नाही तर याला अनेक कारणे जबाबदार असल्याचे समोर येत आहे. वातावरणातील बदल हे नैसर्गिक कारण असले तरी वाढते प्रदुषण हे एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. वर्धा शहरात प्रदुषणाचा विचार केल्यास शहरालगत असलेल्या कंपनीकडे बोट दाखविले जाते. यात कंपनीचा वाटा असला तरी रस्त्याने धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. ही वाहने चालविताना त्यातून निघणारा धुर श्वसनाचे आजार वाढवित आहे. रस्त्याने धावणाऱ्या वाहनात आॅटोतून निघणारा धूर नाकावर रूमाल लावण्यास भाग पाडणारा आहे. शिवाय या आॅटोत पेट्रोलसोबत रॉकेलचा वापर होत असल्याने त्यातून निघणारा धूर सर्वसामान्यांना आजारी पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डायरियाचे २७६ रुग्णसध्या असलेल्या वातावरणातील सर्वात घातक रोग म्हणून डायरियाकडे बघितल्या जात आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास प्राण गमविण्याची वेळ येवू शकते. हा आजार सर्वाधिक चिमुकल्यांना होत असल्याने राज्य शासनाने अतिसार पंंधरवडा सुरू केला. यात रुग्णसंख्या वाढत असल्याने त्याचा कालावधी वाढवून दिला. या कालावधीत जागृती करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असले तरी त्याचा विशेष लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराच्या २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. यात १४७ पुरूष व १२९ महिला रुग्णांचा समावेश आहे. शिवाय शासनाच्यावतीने रुग्णांना घरी जावूनही औषधोपचार सुरू आहे.