शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

1.83 लाख नागरिकांचे होणार 90.35 लाखांचे व्याज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. तर याच काळात अनेकांचा रोजगारही हिरावल्या गेला. अशातच सुरूवातीला महावितरणे नागरिकांना मागील तीन महिन्यातील वीज वापर पाहून देयक दिले. त्यानंतर लॅाकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर मिटर वाचन करून देयक देण्यात आली. ही देयक नागरिकांच्या हाती पडताच आपल्याला जादा विद्युत देयक देण्यात आल्याची ओरड झाली.

ठळक मुद्देशुभवार्ता : थकीत विद्युत देयक तीन टप्प्यात अदा केल्यावरच मिळेल लाभ

  महेश सायखेडे    लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकबाकीदारांचे कुठलेही विद्युत देयक माफ केले जाणार नसल्याचे उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले असले तरी थकबाकीदारांनी महावितरणे आखून दिलेल्या तीन टप्प्यात थकबाकी आणि नियमित येणारे देयक अदा केल्यास थकबाकीवर लागलेल्या व्याजाची रक्कम माफ होणार आहे. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार घरगुती वीज ग्राहकांकडे सध्या ७५ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांनी नियमानुसार तीन टप्प्यात विद्युत देयक अदा केल्यास त्यांचे ९० लाख ३५ हजारांचे व्याज माफ होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. तर याच काळात अनेकांचा रोजगारही हिरावल्या गेला. अशातच सुरूवातीला महावितरणे नागरिकांना मागील तीन महिन्यातील वीज वापर पाहून देयक दिले. त्यानंतर लॅाकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर मिटर वाचन करून देयक देण्यात आली. ही देयक नागरिकांच्या हाती पडताच आपल्याला जादा विद्युत देयक देण्यात आल्याची ओरड झाली. त्यानंतर लॅाकडाऊनच्या काळातील विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर विचार होत उर्जामंत्र्यांनी विद्युत देयक माफ केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्री स्तरावर सध्या या विषयी विचार होत आहे. असे असले तरी थकबाकीदारांना त्यांचे व्याज माफ करून घेण्यासाठी सुवर्ण संधीच सध्या महावितरणे उपलब्ध करून दिली आहे. त्यासंदर्भातील सूचनाही महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.  

एकाच वेळी विद्युत देयक भरल्यास मिळेल २ टक्क्यांची विशेष सवलतएखाद्या थकबाकीदार व्यक्ती किंवा संस्थेने एकाच वेळी थकबाकीची रक्कम भरल्यास त्याचे देयकात लागून आलेले व्याज माफ होत त्या ग्राहकाला पुढील देयकात २ टक्केची सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे विशेष सवलतीचा लाभ घेणाऱ्यांसाठी महावितरणची ही योजना उपयुक्तच आणि दिलासा देणारी ठरणारी आहे. विशेष म्हणजे ही योजना घरगुती वीज ग्राहक, वाणिज्य ग्राहक तसेच औद्यागिक ग्राहकांनाही लागू होणार आहे.

महावितरणने थकबाकीदारांसाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास त्या ग्राहक किंवा संस्थेला विद्युत देयकातील व्याज माफ केले जाणार आहे. शिवाय एकाच वेळी रक्कम अदा करणाऱ्यास २ टक्केची सुट दिली जाणार आहे. याचा लाभ विद्युत वापर संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा.- डॅा. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.

टॅग्स :electricityवीज