शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

जिल्ह्यातील १७०० लघुउद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:52 IST

जूनं ते सोनं, अशी म्हण आजच्या परिस्थितीत अगदी लागू पडते. याचा प्रत्यय बारा बलुतेदार संस्थांच्या कारभारावरून आला आहे. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत.

ठळक मुद्देबेरोजगार तरूण हतबल : बारा बलुतेदार संस्थांना कर्ज देण्यास नकार

अमोल सोटे।ऑनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : जूनं ते सोनं, अशी म्हण आजच्या परिस्थितीत अगदी लागू पडते. याचा प्रत्यय बारा बलुतेदार संस्थांच्या कारभारावरून आला आहे. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचा मोठा फटका या व्यवसायांना बसला आहे. परिणामी, सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने कर्ज उपलब्ध करून देत या उद्योगांना संजीवनी देणे गरजेचे आहे.विद्यमान स्थितीबाबत २००० ते २०१७ पर्यंतच्या काही लघुउद्योग करणाऱ्या युवक तथा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता फारच भयावह सत्य समोर आले आहे. आपली शिक्षणपद्धती ही अप्रत्यक्ष स्वरूपाची आहे. ७० टक्के नागरिक खेड्यात राहतात. शेती हाच मूळ व्यवसाय आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेत अनेक गावांत लघुउद्योग सुरू करण्यात आले. प्रारंभी या लघुउद्योगासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग, भागभांडवल योजना, पंतप्रधान रोजगार योजना (केव्हीआयसी) (केव्हीआयबी), डीआयसीमार्फत जिल्हा उद्योग केंद्र ‘बेरोजगार’ या आधारावर कर्ज देत होते. यासाठी ३५ ते २५ टक्के सबसिडी अनुदान मिळत होते. या कर्जाच्या आधारावर शेळी-मेंढीपालन, गाई-म्हशी, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, भोजनालय, धाबा, घरगुती वापराच्या वस्तु यासह अनेक व्यवसाय धडाक्यात चालत होते. यातून गावातील उत्पन्नही वाढले होते.कालांतराने बेरोजगारी प्रचंड वाढली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बंद झाल्याने पतसंस्था बंद झाल्या. राष्ट्रीयकृत बँकांना अत्यल्प टार्गेटमुळे प्रकरणे थंडबस्त्यात पडली. परिणामी, लघुउद्योग बंद पडलेत. आता प्रधानमंत्री मुद्रा योजना आली. कर्ज देण्याचे गाजर दाखविले गेले. प्रत्यक्षात कर्ज मात्र मिळेना झाले आहे. यामुळे भागभांडवल कसे उभारावे, हा प्रश्न कायम आहे. खेड्यातून शहराकडे नोकरी मिळविण्यासाठी युवकांची धडपड सुरू आहे; पण रोजगार निर्मितीसाठी आवश्यक कंपन्या तथा एमआयडीसी नसल्याने निराशाच हाती येत आहे. स्वयंरोजगाराकरिता कुणी पुढाकार घेतला तरी आर्थिक अडचण, हेच प्रमुख कारण अडचणीचे ठरत आहे. शासनाने विचार करून सर्वांना न्याय देण्याची अपेक्षा सुरक्षित बरोजगार युवकांनी व्यक्त केली आहे.जीएसटीचा बसला फटकावस्तु व सेवा करामध्ये प्रचंड झालेली दरबदल लघुउद्योगांना मारक ठरत आहे. प्रत्येक वस्तुचे बील, त्याचा रेकॉर्ड ठेवणे शक्य नाही. कमी उलाढाल असलेल्यांना वगळल्याचे सरकारने स्पष्ट केले तरी कच्चा माल खरेदीसाठी व्यापारी जीएसटीचे बील माथी मारत आहे. यामुळे लघुउद्योगाला फटका बसल्याचे सुशिक्षित बेरोजगार युवक सांगत आहेत. लघुउद्योग गुंडाळून ठेवल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.फॅशनचा पगडाग्रामीण भागात तयार होणाऱ्या वस्तु विकण्यास प्रचंड मेहनत करावी लागत आहे. मार्केटींगवर फॅशनचा पगडा असल्याने लघुउद्योगाच्या वस्तुचे भविष्य अधांतरी आहे. यामुळे आर्थिक दृष्टीने परवडत नाही. शासनाने नियमात बदल करण्याचीही मागणी होत आहे.