शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

१७ महिन्यांत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक

By admin | Updated: June 12, 2017 01:40 IST

पोलिसांच्या वरदहस्तामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची ओरड आहे.

दोन नवीन ठाण्यांची कारवाई : दारूची २,६९९ गुन्हे दाखल, ५८७ पैकी केले ४७४ गुन्हे उघडलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिसांच्या वरदहस्तामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची ओरड आहे. असे असले तरी नवनिर्मित सावंगी (मेघे) व रामनगर ठाण्यातील पोलिसांनी दारूबंदीच्या कलमान्वये २ हजार ६९९ गुन्हे दाखल करीत २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना अटक केली आहे. शिवाय ५८७ गुन्ह्यांपैकी ४७४ गुन्हे उघड केले. ही कारवाईची आकडेवारी अवघ्या १७ महिन्यांची आहे, हे उल्लेखनिय!शहरातील गुन्ह्यांचा चढता आलेख लक्षात घेऊन सेवाग्राम पोलीस ठाण्याचे विभाजन करून सावंगी (मेघे) तर शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून रामनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. १९ डिसेंबर २०१५ रोजी नवीन पोलीस ठाणे तयार झाले. तेव्हापासून सावंगीचे ठाणेदार म्हणून संतोष शेगावकर तर रामनगरचे ठाणेदार म्हणून विजय मगर जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तथा सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या १७ महिन्यांत दारूबंदीच्या कलमान्वये २ हजार ६९९ गुन्हे दाखल केले आहेत. यातील २ हजार ४३५ दारूविक्रेत्यांना जेरबंदही करण्यात आले आहे.सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ४० गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात ‘अ’ वर्ग गटातील ५, ‘ब’ चे १३ तर ‘क’ वर्ग गटातील २२ गावे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात दारूबंदी महिला मंडळ कार्यरत आहे. या ठाण्याची निर्मिती झाल्यापासून मे २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १ हजार ४७८ गुन्हे दाखल करीत १ हजार २६१ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दारूसाठ्यासह एकूण १ कोटी ८४ लाख ३७ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चोरी, घरफोडी आदी स्वरूपांच्या दाखल झालेल्या २७३ गुन्ह्यांपैकी २४४ गुन्हे उघडकीस आणले असून १ हजार ७११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सिंदी (मेघे) व पिपरी (मेघे) या गावांसह वर्धा शहराचा बहुतांश भाग येतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दारूबंदी महिला मंडळ कार्यरत आहेत. सदर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून मे २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १ हजार २१२ गुन्हे दाखल करीत १ हजार १७४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ लाख १५ हजार ८२० रुपयांच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चोरी, घरफोडी आदी स्वरूपांच्या दाखल असलेल्या ३६० गुन्ह्यांपैकी २३० गुन्हे उघडकीस आणलेत. यात २४७ आरोपींनाही जेरबंद करण्यात आले आहे.दोन्ही पोलीस ठाण्यात मनुष्यबळ अपुरेचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या सावंगी (मेघे) व रामनगर पोलीस ठाण्यात अपूरे मनुष्यबळ आहे. रामनगर ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, आठ अधिकारी व ११० कर्मचारी, अशी मंजूर पदे आहेत; पण येथे सध्या एक पोलीस निरीक्षक, दोन अधिकारी, ५९ कर्मचारी आणि चार चालक कार्यरत आहेत. सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ५६ कर्मचारी अशी पदे मंजूर आहेत; पण सद्यस्थितीत या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, ३९ कर्मचारी तसेच ३ चालक कार्यरत आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणखी प्रभावी कामकाजाची अपेक्षा असली तरी येथे पूरेसे मनुष्यबळ देणे गरजेचे आहे.दोन वर्षांत १२ दारूविक्रेत्यांना शिक्षाजिल्ह्यातील एकूण १९ पोलीस ठाण्यांत २०१६ व एप्रिल २०१७ अखेरपर्यंत दारूबंदीच्या कलमान्वये १६ हजार २६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत एकूण १२ दारूविक्रेत्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नुकतीच सावंगी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कलमान्वये दाखल गुन्ह्यातील दारूविक्रेता आरोपी जयंत शंकर पाटील व शुभांगी जयंत पाटील, दोन्ही रा. तिगाव यांना तर रामनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी फिरोज खॉ पठाण, रा. जुनापाणी चौक पिपरी (मेघे) यांना न्यायालयाने विविध कलमान्वये सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.