शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१७ तासात मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:46 IST

प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्देअजय वाणी हत्याकांड : दोघांनाही बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.येथील तेलघाणी फैल परिसरात आषाढी एकादशीच्या दिवशी १२ जुलैला अजय उर्फ जय वाणी याची प्रेयसीच्या भावाने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यापासून मानेपर्यंत धारदार शस्त्राचे चार घाव तर खांद्यापासून हातापर्यंत तीन असे जवळपास सात घाव ३ ते ४ इंचापर्यंत खोल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींनी तलवारीचा किंवा सत्तुराचा वापर केला असावा, असा अंदाज पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. मृत अजय व आरोपीच्या बहिणीची जुनीच ओळख होती.त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुटुंबियांनाही माहिती होती. प्रेयसीच्या भावाने मृत अजयला तिच्यापासून दूर राहण्याचे वारंवार सांगितले होते. परंतु अजयने याकडे कानाडोळा केल्यानेच हा हत्याकांड घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी अक्षय माहुरे व आशिष लोणकर या दोघांनाही मंगरुळ (दस्तगीर) येथून अटक केली. आरोपी लोणकर आणि मृतक हे दोघेही डीजेचा व्यवसाय करायचे. हत्येनंतर तेलघाणी फैल परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. परंतु पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि नागरिकांच्या मध्यस्तीने हा तणाव शांत करण्यात यश आले. मृत अजयच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :MurderखूनArrestअटक