महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खासगी आणि ग्रामीण अशा सुमारे १४२ च्यावर बँक शाखा आहेत. याच बँकांमध्ये जिल्ह्यातील १६.३५ लाखांच्यावर नागरिकांचे खाते आहे. रोकड हवी असल्यास याच खातेधारकांकडून नजीकचे एटीएम कक्ष किंवा बँक शाखेत जाऊन ती मिळविली जाते. परंतु, चोरट्यांनी सेलू व सेवाग्राम येथून थेट एटीएम पळवून नेल्याने १६.३५ लाख नागरिकांसाठीची विविध एटीएम मधील रक्कम सुरक्षित का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यातील दोन घटनांमुळे पुन्हा एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेलूच्या एटीएममधून ५.९४ लाख तर सेवाग्राम येथील एटीएममधून १२,५०० रुपये चोरट्यांनी पळवून नेले. असे असले तरी समांतर तपास करणाऱ्या सेलू, सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर चोरट्यांची टोळी गवसलेली नाही.सर्वच एटीएम कक्ष ‘सीसीटीव्ही लेस’च्वर्धा जिल्ह्यातील विविध भागात विविध बँकेचे एकूण २२४ एटीएम कक्ष आहेत. या सर्वच एटीएम कक्षांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. परंतु, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही न जुमानता चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवून नेल्याने एटीएम कक्ष किती सुरक्षीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोेलिसांच्या सूचनांकडे बँक अधिकाऱ्यांची पाठच्इतर जिल्ह्यात एटीएम मशीन पळविल्याच्या घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्ह्यातील एटीएमच्या सुरक्षेचा दृष्टीकोण केंद्रस्थानी ठेऊन वर्धा जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांची बैठक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बँक व्यवस्थापकांना एटीएमच्या सुरक्षेबाबत आरबीआयच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्याकडे बँकेच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानल्याची चर्चा सध्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.एसबीआयच्या एकाही एटीएमवर सुरक्षारक्षक नाहीतजिल्ह्यातील सुमारे दुसऱ्या क्रमांकाची आणि अनेकांचे विश्वास संपादीत करणारी बँक म्हणून एसबीआयची ओळख. परंतु, याच बँकेच्या ४४ एटीएम पैकी एकाही एटीएम कक्षात सुरक्षारक्षक कार्यरत नसल्याचे लोकमतच्या पाहणीत पुढे आले. अधिक माहिती घेतली असता बँकेची पॉलीसी तसी असल्याने एटीएममध्ये सुरक्षरक्षकच नेमण्यात आले नसल्याचे बँकेच्या एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, अधिकृतपणे बँकेची बाजू सांगा असे म्हटल्यावर या अधिकाऱ्यांने बोलण्याचे टाळण्यातच धन्यता मानली, हे विशेष.जुन्याच बंदुकीने सुरक्षाविविध बँकांच्या एटीएम मध्ये रोकड टाकण्याचे जबाबदारी बँकांनी विशिष्ट यंत्रणेला दिली असली तरी रोकड घेऊन जाणाºया कॅश व्हॅनमध्ये बंदुकधारी सुरक्षारक्षक असतो. परंतु, सध्याच्या विज्ञान युगात त्यांच्याकडेही जुन्याच बंदूका राहत असल्याने त्याही रोकडीची सुरक्षा कशी होणार असा प्रश्न नागरिकांकडून सध्या विचारला जात आहे.जिल्ह्यात अधिकृत २३४ शस्त्रधारीसेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच सेनेतील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने शस्त्र बाळगण्याचा परवाना दिल्या जातो. हेच शस्त्रधारी बहूदा सुरक्षा रक्षक म्हणून विविध बँकेत कार्यरत होतात. सदर परवान्याचे प्रत्येक तीन वर्षांनी नुतणीकरण करणे बंधनकारक असते. पण यंदाच्या वर्षी अनेकांनी परवान्याचे नुतणीकरण केलेले नाही. विशेष म्हणजे एकही शस्त्रधारी सुरक्षारक्षक सध्या जिल्ह्यातील एकाही एटीएम कक्षात कार्यरत नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.बँकेच्या अधिकाऱ्यांना एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्याबाबतच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. सेवाग्राम आणि सेलू येथील एटीएम चोरी बाबातचा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जात आहे. लवकरच गुन्हा उघडकीस येईल.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.एटीएम मशीन पळविण्याच्या घटना चुकीच्या असून त्याला वेळीच आळा बसला पाहिजे. सदर विषय गंभीर असल्याने बीएलबीसीच्या बैठकीत सर्व बँक समन्वयक आणि व्यवस्थापकांना पाचारण करून त्यांना सुरक्षारक्षक नेमण्यासह बँकेच्या समन्वयाकाचा भ्रमणध्वनी क्रमांक त्या त्या एटीएम कक्षात लावण्याबाबत योग्य सूचना देण्यात येईल. जो बँक अधिकारी हयगय करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.- बिरेंद्र कुमार, व्यवस्थापक, लिड बँक वर्धा.इतर जिल्ह्यात चोरट्यांनी एटीएमला टार्गेट केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बँक अधिकाऱ्यांची डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांना एटीएम कक्षात सुरक्षारक्षक नेमण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. एटीएम चोरी बाबत सेलू आणि सेवाग्राम येथे दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल.- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा.
१६.३५ लाख नागरिकांचे पैसे असुरक्षित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST
जिल्ह्यातील दोन घटनांमुळे पुन्हा एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेलूच्या एटीएममधून ५.९४ लाख तर सेवाग्राम येथील एटीएममधून १२,५०० रुपये चोरट्यांनी पळवून नेले. असे असले तरी समांतर तपास करणाऱ्या सेलू, सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर चोरट्यांची टोळी गवसलेली नाही.
१६.३५ लाख नागरिकांचे पैसे असुरक्षित?
ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : एटीएम पळविणारे पोलिसांपासून दूरच, बँक अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष