शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

१६३ टपाल मते अवैध

By admin | Updated: May 17, 2014 00:25 IST

वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यावेळी आलेल्या १४0३ मतांमधून १६३ टपालीमते अवैद्य ठरली.

प्रफुल्ल लुंगे - वर्धा

वर्धा लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यावेळी आलेल्या १४0३ मतांमधून १६३ टपालीमते अवैद्य ठरली. यामुळे सुशिक्षीत म्हणवून घेणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सुशिक्षीत पणावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

टपाल मतपत्रिकांमध्ये बहुजन सामजपार्टीचे चेतन पेंदाम यांना ७४, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सागर मेघे यांना ४0५, भाजपाचे रामदास तडस यांना ७४0 मते मिळाली. आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे श्रीकृष्ण उबाळे यांना ११ समाजवादी पार्टीचे डॉ. अंकुश नवले यांना सात बहुजन मुक्ती पार्टीचे किशोर किनकर यांना दोन, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेरंद मेश्राम एक, आपचे मो. अलीम पटेल मो.वहीद यांना १९, अरविंद लिल्लोरे, जगदीश कडू, विलास तडस, दिपकसिंह देशमुख, जयदीप देशमख, शुन्य, मनिष तेलरांधे, रवी येळणे, जगन्नाथ राऊत, राजेंद्र शंभरकर व सचिन राऊत यांना शुन्य तर अपक्ष भास्कर नेवारे एक, शामबाबा निचीत एक, संजय चिडाम एक तर नोटावर (कुणालाही नाही) पाच मते पडली.

टपाली मतदारांची १६३ एवढी मते अवैद्य होणे हे सुशिक्षीत मतदारांसाठी धक्कादायक बाब आहे. यांच्यापासून अशिक्षीत मतदारांनी काय बोध घ्यावा हा प्रश्न आहे.

काही निवडणुकीत अनेक मतदारांचे भवितव्य टपाली मतांवरही अवलंबून असते. एवढी काट्याची टक्कर होते. अशावेळी या मतदारांची जर मते एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अवैद्य झाली तर निकालाचे चित्र पालटते. स्वत:ला सुशिक्षीत म्हणवून घेणार्‍या मतदारांना शासकीय नोकरीत असताना आपला महत्वपूर्ण मतदानचा अधिकारही योग्यपणे बजावता येत नसेल तर यांच्यापेक्षा अशिक्षीत मतदार बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

निवडणुकींचे प्रशिक्षण देतांना अशा कर्मचार्‍यांना स्वत:चे मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण सर्वप्रथम देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या जडणघडणीत एक-एक मत देशाचे भवितव्य घडवू शकते, अशी घशाला कोरड येतपर्यंत सांगणारी यंत्रणा व मतदानापासून कुणाही वंचीत राहू नये यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असताना खुद्द शासकीय अधिकारी-कर्मचारीच मतदानाच्या महत्त्वपूर्ण हक्काबद्दल किती बेफीकर आहे, याचा प्रत्यय येतो.