शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

१.५३ लाखांचा गांजा जप्त

By admin | Updated: September 4, 2016 00:26 IST

सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.

तिघांना अटक : सेवाग्राम रेल्वे स्थानकावर कारवाईवर्धा : सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात संशयीतरित्या बसून असलेल्या तिघांकडून १.५३ लाख रुपये किंमतीचा १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली. मुजफ्फर खान नियामत खान (३०) रा. हैदरपुरा इदगाह फाटा पठाण चौकसमोर अमरावती, आप्पाराव नुकूराजू गौड (४०) रा. चिन्नागडा, पो.स्टे. चिंतापल्ली, जि. विशाखापट्टनम आणि शेख आबीद शेख रज्जाक (२०) रा. जमील कॉलनी, अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.रेल्वे पोलिसांच्यावतीने नित्याप्रमाणे स्थानकावर तपासणी सुरू असताना फलाट क्रमांक तीनवर नागपूरकडे जाण्यासाठी तीन संशयीत इसम आढळून आले. त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना रेल्वे पोलीस चौकी सेवाग्राम येथे आणून तपासणी केली असता त्यांच्या पोटावर पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये काहीतरी बांधून असल्याचे दिसले. त्यांची अधिक चौकशी केली असता गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा गांजा पांढऱ्या रंगाच्या चार ते पाच फुट लांब पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता. ती पिशवी चापट करून तिघांनीही पोटाला गुंडाळली होती. ती पद्धतशीरपणे बांधून ते नागपूर येथे घेऊन जात होते. प्रत्येकाकडे सुमारे पाच किलो प्रमाणे तिघांकडून १५ किलो ३४१ ग्रॅम किंमत १ लाख ५३ हजार ७१० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रसंगी पंच व नायब तहसीलदार सी.जी. बर्वे यांच्या समक्ष पंचनामा करून आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक नालट, दिलीप बारंगे, श्याम धुर्वे, अशोक हनवंते, राहुल यावले तसेच सेवाग्राम येथील पोलीस उपनिरीक्षक जाटोलीया, उमेशसिंग, आर.के. भारती, सुभाष जुमळे, प्रमोद सांगळे, चौधरी, लोकेश राऊत, गणेश पवार, आकाश मेश्राम यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी) एका फेरीसाठी चार हजार रुपयेरेल्वेच्या माध्यमातून गांजा बहुतांश भागात पोहोचविला जातो. यासाठी गरीब व थोडी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले युवक हेरले जातात. अमरावती येथील दोन्ही युवकांनी पहिल्यांदाच गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. शिवाय किती रुपयांचा माल आहे, याबाबत माहिती नाही. आम्हाला संबंधित टोळीकडून प्रत्येक फेरीसाठी तीन ते चार हजार रुपये दिले जातात. शिवाय जेवण आणि अन्य खर्चही तेच करतात, असे सांगितले. यावरून गांजाची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.