शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

151 मृत कोविड बाधितांवर वर्धेत झालेत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यातील स्थिती : ४९ मृतक जिल्ह्याबाहेरील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च महिन्यात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असून तशी नोंद वर्धा नगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मार्च महिन्यात या वैकुंठधामात तब्बल १५१ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यापैकी ४९ व्यक्ती जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणची व्यवस्था सध्या तोकडी पडत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्थाही उभी करणे गरजेचे आहे.

सूचना मिळताच स्मशानभूमितील कर्मचारी होतात ॲक्टिव्हआज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करायचे आहेत याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही माहिती मिळताच कर्मचारीही ॲक्टिव्ह मोडवर येत संपूर्ण तयारी करतात. शववाहिनीच्या सहाय्याने आणण्यात आलेले मृत कोविड बाधिताचे पार्थिव पीपीई किट परिधान केलेले व्यक्ती थेट रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर त्या मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो. जवळपास अशाच पद्धतीचा अवलंब करून काही मृत कोविड बाधितांवर दफनविधीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

आर्वी तालुक्यातील घटनेनंतर बदलली रणनीतीआर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे १० मे रोजी जिल्ह्यातील कोविडचा पहिला रुग्ण सापडला. या महिला कोविड बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. तर अंत्यविधी झाल्यानंतर या महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीवर वर्धा येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

एकाच वेळी नऊ मृतांना मुखाग्नीची व्यवस्थावर्धा शहरातील इतवारा भागात असलेल्या वैकुंठधामात मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी आणि विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात एकाच वेळी तब्बल नऊ मृत कोविड बाधितांना मुखाग्नी देण्याची व्यवस्था आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू