शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नालीत अन्न टाकणाऱ्या हॉटेल मालकाला १५ हजारांचा दंड

By admin | Updated: January 12, 2017 00:32 IST

हॉटेलात उरलेले शिळे अन्न पालिकेच्या नालीत टाकून ती तुंबण्यास कारण ठरलेल्या आर्वी नाका ...

पालिकेची कारवाई : सडक्या अन्नामुळे परिसरातील नागरिक त्रस्त वर्धा : हॉटेलात उरलेले शिळे अन्न पालिकेच्या नालीत टाकून ती तुंबण्यास कारण ठरलेल्या आर्वी नाका परिसरातील नवदूर्गा स्वीट मार्टला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. नवदूर्गा स्वीट मार्टच्यावतीने त्याच्या हॉटेलात तयार करण्यात येत असलेल्या पदार्थांपैकी शिल्लक असलेले पदार्थ व काही इतर अन्न हॉटेल परिसरात असलेल्या पालिकेच्या मालकीच्या नालीत टाकण्यात येत होते. परिणामी या नालीत हे अन्न सडून त्याची दुर्गंघी पसरत असल्याची ओरड होती. यातच पालिकेच्यावतीने शहरातील हॉटेल तपासणीची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत सदर हॉटेलवर धाड टाकुन चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. शिवाय हॉटेल मालकाच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. सदर हॉटेल मालकाकडे पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र व येथे काम करणाऱ्या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवालही नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील स्वच्छता कायम राखण्याकरिता व नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिकेच्यावतीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातल तीन हॉटेल्सवर कारवाई केली असून मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी अजय बागरे, अशोक ठाकूर, देव, राजू निखाडे, नाहारकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.(प्रतिनिधी) दंडाची रक्कम कार्यवाहीच्या वेळीच वसूल पालिकेच्यावतीने हॉटेल्सची तपासणी करीत असताना आढळलेल्या त्रुटीनुसार आकारण्यात येणारा दंड हा त्याचवेळी वसूल करण्यात येत आहे. मंगळवारी करण्यात आलेला १५ हजार रुपयांचा दंड हॉटेल मालकाकडून वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने यावेळी देण्यात आली आहे.