शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१५० नागरिकांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:35 IST

मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : फायनान्सच्या नावाखाली नऊ लाखांची अफरातफर

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, अंतोरा येथील रविंद्र प्रांजळे, गणेश कुरवाडे चिंचोली या दोघा एजंटनी मानसी फायनान्स कन्सल्टन्सी प्रा. लि. न्यू लक्ष्मीनगर कॉलनी नं. २ जय प्लाझा सर्कीट हाऊस रोड गोरेगाव वेस्ट मुंबई या नावाने कंपनी तयार केली. याचे पत्रक छापून ग्रामीण भागात वाटण्यात आली.यामध्ये विमा खर्च, प्रोसेसींग फी, कागदपत्र रजिस्टर्ड यासाठी सहा हजार रूपये देऊन एक लाख कर्ज मिळते, असे सांगितल्यावर लोकांनी त्यावर विश्वास करून पैसे देणे सुरू केले. लहान आर्वी ३५, देलवाडी २०, अंतोरा १५, खंबीत १६, अंबिकापूर १०, चिंचोली ४, किन्हाळा ५, जोलवाडी ७, बेलोरा १३, माणिकनगर ६ आणि इतर गावात २० असे एकूण १५० लोकांजवळून यामध्ये महिला बचत गट सदस्य, गावातील नागरीक यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये गोळा करण्यात आले. त्याच्या पावत्या या दोन्ही एजंटनी दिल्या नाही. सर्व लोकांना २ नोव्हेंबर २०१८ ला प्रत्येकी १ लाख कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजवरी १७ वेळा तारीख पे तारीख देत मोठ्या प्रमाणात बनवेगिरी करण्यात आली. शेवटी लोकांनी प्रांजळे व कुरवाडे या दोघांना ६ हजार परत देण्याची मागणी केली असता त्यांनी पळून गेलो का, कंपनीने फसविले असे म्हणत पैसे देणाऱ्यांच्या अडचणीतच भर टाकली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देलवाडीचे राजेंद्र कोहळे, लहानआर्वीचे विलास गुंबळे व आदींनी आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.आष्टी (शहीद)चे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून याप्रकरणी आर्थीक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी जाळा पसरविले असून त्यांच्याकडून होणाºया आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनीही कुणालाही असे पैसे देवू नयेत, असे पोलिसांनी केले आहे.मानसी फायनान्स या कंपनीकडून १ लाख कर्ज देतो असे सांगितल्यावर आम्ही त्यावर विश्वास ठेवून प्रत्येकी ६ हजार रूपये दिले होते. मात्र, ४ महिने लोटूनही कर्ज दिले नाही. आमची फसवणूकच झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.- राजेंद्र कोहळे, देलवाडी.सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.- जितेंद्र चांदे, ठाणेदार, आष्टी (शहीद).

टॅग्स :fraudधोकेबाजी