शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनसाठी १५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:48 IST

वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे काम पुर्णत्त्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता आर्वी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काही भाग असे मिळून एकूण २८ गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनिम्न वर्धा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास : शेतकºयांचे जीवनमान उंचावणार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : वर्धा नदीवरील निम्न वर्धा धरणाचे काम पुर्णत्त्वास येत आहे. या प्रकल्पाकरिता आर्वी तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील काही भाग असे मिळून एकूण २८ गावातील जमिनीचे संपादन करण्यात आले होते. या धरणाकरिता परिसरातील शेतकºयांच्या जमिनीसह घरेसुद्धा बाधीत झालेली आहेत. या शेतकºयांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता माजी आमदार दादाराव केचे यांनी २०१० पासून प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नाला आता यश आले असून प्रकल्प पूर्णत्त्वास येण्याकरिता १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री झाले त्या काळापासून विदर्भात अनेक योजना अस्तित्त्वात आल्या. यात तालुक्यातील शेतकºयांच्या फायद्यासाठी २६४.४७ कोटी रुपयांची पथदर्शी सूक्ष्म सिंचन योजना मंजूर केली. या निधीपैकी १५० कोटी निधी निर्गमित झाले आहे. निम्म वर्धा प्रकल्प हा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता तसेच या योजनेची माहिती देण्याकरिता २०१६ मध्ये निम्न वर्धा धरणावर मुख्यमंत्र्यांनी स्वत: बैठक घेतली होती.या प्रकल्पाकरिता मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनी सहकार्य केले. कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात या सुक्ष्म सिंचनामुळे हरितक्रांती घडेल अशी अपेक्षा शासनाच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.राबविण्यात येणाºया योजनेची वैशिष्टे- या योजनेमुळे ४० गावातील ८,४०० हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश निम्म वर्धा प्रकल्पाच्या जलाशयातून २४.०३ द.ल घ.मी. इतके पाणी प्रस्तावित धनोडी येथील पंपगृहातून उचलून आर्वी तालुक्यातील ८४०० हेक्टर क्षेत्रात बंदिस्त नलिकेतुन व सूक्ष्म सिंचनाकरिता सोडण्यात येत आहे. यात प्रत्येकी १ हेक्टर क्षेत्रापर्यंत सूक्ष्म सिंचन पद्धतीने सिंचनाचे प्रयोजन करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून ७५ टक्के ठिबक प्रणाली व २५ टक्के भागात तुषार सिंचन देण्याचे प्रयोजन आहे. या योजनेसाठी ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत सब स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे.- पाणी वापर तसेच शेतकी प्रशिक्षण देण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकामही यात होणार आहे. बांधकाम परिसरातील अंतर्गत रस्ते, दर्शक फलक, रस्ते, रेल्वे ओलांडणे इत्यादी किरकोळ कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पाणी वापर संस्था स्थापन करून घनमापन पद्धतीने पाणी वितरण करण्याचा प्रस्ताव आहे.