शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांत १५ व्यक्तींनी भूषविले पं. स.चे सभापतीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होणार असल्याचे म्हटले जाते. असे असले तरी साहसिक जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचेही प्राबल्य काही गणांत आहे.

विजय माहुरेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे गट व गण जाहीर होत प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागात हळूहळू हा होईना पण राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. ६० वर्षांत १५ व्यक्तींनी सेलू पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले असून, यानंतर कोणाची वर्णी लागणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होणार असल्याचे म्हटले जाते. असे असले तरी साहसिक जनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचेही प्राबल्य काही गणांत आहे. तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर आपली सत्ता यावी, यासाठी आतापासूनच विविध पक्षाचे पुढारी राजकीय खेळी खेळत सक्षम उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत. आरक्षणाची सोडत कशी राहील, याचा अंदाज राजकीय नेत्यांना काही प्रमाणात असल्याने तशा उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकूणच परिसरात सध्या राजकीय वातावरण हळूहळू तापत आहेच. 

निवडणूक काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेचीच-  सेलू तालुक्यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगलेच नेटवर्क आहे. गावागावात पदाधिकारी व कार्यकर्ते असून जिल्हा परिषदे व पंचायत समितीची निवडणूक भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेचीच राहणार आहे.

यांनी भूषविले सभापतीपद-    अमृत काटकर (दोनवेळा), पुरुषोत्तम दाते, मनोहर सोनटक्के, सुरेश जयस्वाल, जंगलू मसराम, विजय जयस्वाल, चंदा उईके, रामचंद्र चाफले, भीमराव गोमासे, मैनावती सोनपितळे, नीलिमा दंडारे, श्रीराम तुमडाम, मंजुषा दुधबडे, जयश्री खोडे, अशोक मुडे यांनी सेलू पंचायत समितीचे सभापती म्हणून पद भूषविले आहे.

पहिल्या सभापतीचा मान काटकर यांचाच-    सेलू पंचायत समितीचे पहिले सभापतीपद मोही येथील काँग्रेसचे अमृत सीताराम काटकर यांनी भूषविले होते. १९६२ ते १९९० सलग २८ वर्ष हे पद काँग्रेस पक्षाला मिळाले. पण नंतर जयस्वाल गटाची पकड या पंचायत समितीवर राहिली. त्यांना अपक्ष, भाजपची साथ मिळाली.  अलीकडच्या दहा वर्षांत भाजपचे अधिपत्य या पंचायत समितीवर राहिले. २०१७ ते २०२२मध्येही भाजपची सत्ता होती. मात्र, प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी भाजपचे अशोक मुडे हे सभापती होते. तर सध्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पंचायत समितीवर प्रशासक राज आहे.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती