शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री दत्तक गावात १५ जणांचे मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:12 IST

युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने वर्धा येथून काढण्यात आलेली भू-देव यात्रा सेलू येथील मुक्कामानंतर बुधवारी केळझर येथे दाखल झाली.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनची भू-देव यात्रा : शुक्रवारी घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे

ऑनलाईन लोकमतकेळझर : युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने वर्धा येथून काढण्यात आलेली भू-देव यात्रा सेलू येथील मुक्कामानंतर बुधवारी केळझर येथे दाखल झाली. गावात यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही शासनाने अतिक्रमण धारकांबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने केळझर येथील काही अतिक्रमण धारकांसह सुमारे १५ जणांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मुंडण करून यात्रेत सहभाग घेतला.शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबीयांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या यात्रेने मंगळवारी पवनार येथे काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर मंगळवारी रात्री सेलू येथे मुक्काम केला. बुधवारी सकाळी ही यात्रा नागपूरच्या दिशेने निघाली. दुपारी केळझर येथे दाखल झालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सावंगी (आसोला) येथे बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरूवारी ही यात्रा नागपूर येथे सायंकाळी उशीरा पोहोचणार आहे. शुक्रवार २३ मार्च रोजी ही यात्रा नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयावर धडक देणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबीयांना नि:शुल्क जमिनीचे पट्टे द्यावे, यासाठी साकडे घालणार आहे. या पदयात्रेचे नेतृत्व युवा परितर्वन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, पलाश उमाटे करीत आहेत. या भू-देव यात्रेत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.