शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांत १.५ दलघमी पाणी

By admin | Updated: May 13, 2016 02:06 IST

शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.

शहरात पाणीटंचाई : पालिकेने घेतले पाणी विकतहिंगणघाट : शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामुळे शहर वासियांची तहान भागविण्यासाठी नगर परिषदेने पाटबंधारे विभागाकडून १५ लाख रुपयांत १.५ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केलेली आहे. हा पाणीसाठा आजंती बंधाऱ्यात उपलब्ध झालेला आहे. भविष्यात नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरीही नागरिकांनी जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. शहरात अनेक ठिकाणी बोअरींगची व्यवस्था आहे; परंतु उन्हाळ्यामध्ये बोअरींगचा वापर वाढल्यास बोअरींग बिघडण्याच्या तक्रारीतही सातत्याने वाढ होत आहे. त्याच्या दुरुस्तीकरिता नगर परिषदेने पथक तैनात करण्यात आले असून त्यांना तक्रारीची प्रथम दखल घेण्याचे निर्देश असल्याचे पालिकेकडून देण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागात पाण्याविना नागरिकांची भटकंती होवू नये म्हणून नगर पालिकेच्या वतीने दोन टँकरद्वारे सतत पाणी पुरवठा सुरू आहे. ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवत असेल त्यांनी नगर परिषदेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. यातून पाण्याची समस्या सोडविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याची बचत करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्यासह न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, पाणीपुरवठा सभापती बादलसिंग रेवते, आरोग्य सभापती जितेंद्र कुकसे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती मुडे, शिक्षण सभापती सोनाली सुटे, बांधकाम सभापती गीता मांडवकर, स्थायी समिती सदस्य प्रा. राजू अवचट, शंकर मोहमारे, अनिल भोंगाडे व सर्व नगर सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)