शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

1,480 गरोदर महिला, स्तनदा माता अन् बेडरिडनला कोविड कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ३६० व्यक्तींना लसीचा पहिला, तर १ लाख ९० हजार ५४६ लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ७.६७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस गरोदर महिला, स्तनदा माता, तसेच बेडरिडन व्यक्तींसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बेडरिडन लाभार्थ्यांनाही कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आतापर्यंत १ हजार ४८० गरोदर महिला, स्तनदा माता अन् बेडरिडन व्यक्तींना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कोरोनाची व्हॅक्सिन घेऊन स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ३६० व्यक्तींना लसीचा पहिला, तर १ लाख ९० हजार ५४६ लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ७.६७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात सध्या केवळ दोन ॲक्टिव्ह कोविड बाधित असून जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण झटपट व्हावे यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

बेडरिडनला घरपोच दिली जातेय लसजिल्ह्यातील २ हजार २७० बेडरिडन व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. या लाभार्थ्यांना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस देत आहेत. आतापर्यंत ९०८ बेडरिडन व्यक्तींना कोविडची लस देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोविड लस गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बेडरिडन व्यक्तींसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लसीबाबत कुठलीही शंका मनात ठेवू नये. शिवाय लस घेऊन स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक,                                                                          प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या