शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

कर्करोग जनजागृती सप्ताहांतर्गत १४७ रुग्णांची तपासणी

By admin | Updated: February 7, 2016 00:19 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

तपासणी शिबिर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम वर्धा : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यात आयोजित शिबिरात कर्करोगाच्या १४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिवाय व्हीआरए तपासणी २७, संशयित गर्भाशय कर्करोग रुग्ण ३, संशयित स्तन कर्करोग रुग्ण १ व संशयित तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.जागतिक कर्करोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. गोपाल लांडगे, डॉ. एच.बी. खुबनानी, डॉ. मीना हिवलेकर, डॉ. भावना भोयर व जिल्हा रुगणालयातील कर्मचारी उपस्थित होते. तपासणी शिबिर ११ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. रुग्णालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही व इतरांना करू देणार नाही, अशी शपथ घेतली. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. यात जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात तपासणी शिबिरघे घेण्यात येत आहे. या शिबिरांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी यांनी केले. शिबिरात कर्करोगाबाबत समुपदेशन, ३० वर्षांवरील व्यक्तींना कर्करोगाची माहिती, कारणे, त्यामुळे होणाऱ्या गुंतागुती याबाबत शास्त्रीय माहितीच्या आधारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध आरोग्य संस्थांतर्गत जनजागृती शिबिर, धुम्रपान विरोधी दिन, गरोदर मातांसाठी रक्तदाब तपासणी आदी शिबिरे घेतली जाणार आहे. सदर शिबिरादरम्यान त्यांना रक्तदाबाविषयी माहिती देण्यात येणार आहे. आरोग्यदायक सवयी, जीवन जगण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. परिपूर्ण व आरोग्यदायी आहाराबाबत माहिती देण्यात येईल. शिबिरात निश्चित रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. निश्चित निदान झालेल्या रुग्णांना गुंतागुंत आढळल्यास योग्य वैद्यकीय तपासण्या करून गरज भासल्यास संदर्भित करण्यात येणार आहे. एनसीडी कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत समुपदेशन, गृहभेट यातून रुग्णांना मदत व मार्गदर्शन करणे, संदर्भ सेवा देणे, समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यास सूचविणे, काय खावे, किती खावे याचे महत्त्व समजावून सांगणे, तंबाखू, मद्यपान, अहितकारी, आहार याविरूद्ध समुदायाला एकत्र आणणे आदी सुविधा देण्यात येणार असल्याचेही डॉ. मडावी यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)