समुद्रपूर : तालुक्यातील वाघाडी नदीच्या पुलावर नाकाबंदी करून पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारसह दारूसाठा जप्त केला आहे. यात मोठ्या प्रामणात देशी दारू असून तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अटकेत असलेल्यांची नावे जितेंद्र रामदास दांडगे (२९), नीलेश वसंत चचाने (२०), राजेंद्र दिनकर शिंदे (३०) सर्व रा. केळझर अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गावात बेलामार्गे दारूसाठा येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या दारूबंदी विशेष पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी वायगाव (गोंड) मार्गावर वाघाडी नदीवर नाकेबंदी करीत मारोती कारसह १ लाख ४० हजार रुपयांच्या ४०८ देशी दारूच्या शिशा जप्त केल्या. विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, बी.आर. देवढे, जमादार प्रेमराज अवचट, दीपक राऊत, मनोज धात्रक, सुधीर रडके, नितेश यांना नागपूर बेला मार्गे दारूसाठा येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी नाकेबंदी करून एमएच ३०-एफ १३३३ या कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये देशी दारूच्या आठ पेट्या व पोत्यामध्ये एकूण ४०८ शिशा आढळून आल्या.या कारवाईत एक लाख रुपयांची कार व ४० हजार ८०० रुपयांचा दारूसाठा असा एकूण १ लाख ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जितेंद्र दांडगे, नीलेश चचाने, राजेंद्र शिंदे या तिघांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
कारसह १.४० लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Updated: October 25, 2014 22:44 IST