शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त

By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST

ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली़ योग्य रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असते; पण डॉक्टर शासकीय

रुग्णसेवा कोलमडली : १२ प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाचप्रशांत हेलोंडे -ं वर्धा ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली़ योग्य रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असते; पण डॉक्टर शासकीय नोकरी पत्करण्यास तयार नसतात़ परिणामी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे़ या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ वर्धा जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत़ या केंद्रांतर्गत आरोग्य उपकेंद्रही सुरू आहेत़ हा आरोग्याचा डोलारा सांभाळताना डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वॉर्ड बॉय, शिपाई ही संपूर्ण पदे भरलेली असणे गरजेचे आहे़ कर्मचारी व सुविधांनी परिपूर्ण आरोग्य केंद्रातूनच ग्रामस्थांना योग्य सेवा दिली जाऊ शकते; पण जिल्ह्यातील २७ पैकी १० प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ यात अन्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहेच़ यामुळे ग्रामीण रुग्णसेवा प्रभावित झाली आहे़ जि़प़ आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या १० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे़ संबंधित आरोग्य केंद्रांत रूजू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदव्यूत्तर पदवीच्या (एमडी) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे़ यामुळे ही पदे रिक्त झाली आहेत़ यात कन्नमवारग्राम, आंजी (मोठी), मांडगाव व वायफड येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे तर गौळ, सिंदी (रेल्वे), नंदोरी, साहूर आणि नाचणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत़ १० प्राथमिक आरोग्य केंद्रांतील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णसेवा कोलमडली आहे़