शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

१४ कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:52 IST

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले.

ठळक मुद्देसहकारी बँकेतील व्यवहाराची गाडी रुळावर

ऑनलाईन लोकमतवर्धा : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले. आता कर्जमाफीने बँक तारली गेली असून ४० टक्के वा अधिकाधिक एक लाख याप्रमाणे ठेवीदारांना १४ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांकडील कर्ज अडकले तथा खासगी संस्था, उद्योगांना दिलेले कर्ज वसूल करता आले नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तोट्यात आली. शिवाय रिझर्व्ह बँकेने दिलेले संगणकीकरण तथा वसुली करण्याचे निर्देशही बँकेला वेळेपर्यंत पाळता आले नाही. परिणामी, रिझर्व्ह बँकेने राज्यातील काही शाखांचे परवानेच रद्द केले. यात वर्धा सहकारी बँकेचे व्यवहारही बंद झाले. बँकच बंद झाल्याने वसुलीही ठप्प झाली. असे असले तरी काही प्रमाणात पीक कर्जाची वसुली करून बँकेने तग धरला; पण यात व्यवहार सुरळीत होणे नव्हते. शासनाकडे मदतीची मागणी केली. यावर बरेच वर्षे खल झाले. अखेर राज्य शासनाकडून १२७ कोटी ९६ लाख रुपये, केंद्र शासनाकडून २२ कोटी १७ लाख रुपये तर नाबार्डकडून ११ कोटी ८ लाख रुपये प्राप्त झाले. या रकमेतून सहकारी बँकेला परवाना परत मिळविता आला.दरम्यान, ठेवी अडकल्याने ठेवीदारांत असंतोष होता. अनेकदा मोर्चे काढून बँकेने ठेवी परत करण्याची मागणी केली गेली; पण बँक प्रशासन हतबल होते. आता मात्र बँकेला कर्जमाफीच्या रूपात नवीन उर्जा मिळाली आहे. सहकारी बँकेच्या १२ हजार थकबाकीदार शेतकºयांना शासनाकडून ५५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. या रकमेतून बँकेला व्यवहार सुरळीत करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आणखी १५ हजार शेतकºयांचे कर्ज माफ व्हायचे असून ती रक्कमही बँकेला संजीवनी ठरणार आहे. बँकेला कोष उपलब्ध झाल्याने ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या ठेवीच्या ४० टक्के प्रमाणे वा अधिकाधिक एक लाख रुपयांप्रमाणे ठेवी परत केल्या जात आहेत. यात आजपर्यंत १४ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. ठेवी परत मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. बँक पुन्हा विश्वास संपादित करीत असल्याचेही दिसून येत आहे.पीक कर्जासाठी प्रस्ताव पाठविणारखरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्याला ७५० कोटींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे पीककर्ज राष्ट्रीयकृत तथा खासगी बँकांच्या १२८ शाखांतून वितरित केले जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्जवाटप करायचे झाल्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.ठेवी स्वीकारणे सुरूकर्जमाफीच्या रकमेतून बँकेला व्यवहार सुरळीत करण्याची संधी मिळाली आहे. आणखी १५ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यातूनही बँकेला बऱ्यापैकी कोष उपलब्ध होणार आहे. शिवाय जुन्या ठेवी परत केल्या जात असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादित होत आहे. आता व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने बँकेने नवीन ठेवी स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे.