शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 13 हजार 798 शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खत आणि बियाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना खते, बियाणांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते थेट त्यांच्या बांधावर पोहोचविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ हजार ७९८ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे व खते पोहोचविण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती.  यावर्षी देखील पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून  ४ लाख ३७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतीच्या हंगामात बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांच्या शेतकऱ्यांना उपलब्धतेसाठी रासायनिक खते व बियाणांची खरेदी आपल्या गावातील शेतकरी, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तथा कृषी विभाग यंत्रणांच्या संयुक्त सहकार्याने  केल्यास रास्त किमतीत उच्च गुणवत्तेचे रासायनिक खते व बियाणे तांत्रिक मार्गदर्शनासह प्राप्त होईल तसेच वाहतूक खर्चात देखील बचत होणार आहे, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

यांच्यासोबत साधा संपर्क जिल्ह्यातील शेतकरी बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पं.स, कृषी विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुकास्तरावरील किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांची मागणी असलेले रासायनिक खत व बी बियाणे यांचे शेतकरी गटप्रमुख  यांच्या वतीने व्यवहार पूर्ण करून संबंधित गावात पुरवठा करून घ्यावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांधावर खत व बियाणे योजनेंतर्गत कृषी निविष्ठांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :agricultureशेती