शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट

By admin | Updated: November 27, 2015 02:22 IST

अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले.

कालव्याचे पाणी शिरले शेतात : २० ते २५ लाख रुपयांनी फटकाआर्वी : अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले. नादुरूस्त कालव्याचे पाणी शेतात शिरल्याने १३ शेतकऱ्यांच्या ६५ एकर शेतातील तूर पीक पूर्णत: नष्ट झाले. यात शेतकऱ्यांचे तब्बल २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कालवा दुरूस्त करण्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली; पण संबंधित विभाग त्यासाठीही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.तालुक्यातील अंबिकापूर-वाठोडा मार्गावर उर्ध्व डावा कालवा क्र. पाच आहे. या कालव्यातून परिसरातील शेतकऱ्यांना पाणी वितरित केले जाते. दोन दिवसांपूर्वी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. वितरिका नादुरूस्त असल्याने सोडलेले पाणी पुढे न जाता थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. यामुळे सुमारे १३ शेतकऱ्यांच्या ६० हेक्टर शेतातील तुरीच्या पिकांची धुळधान झाली आहे. तुरीचे पीक फुलावर आले होते. अचानक पाणी सोडले गेल्याने पिकच खराब झाले आहे. अंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके यांच्या शेतात कालवा अर्धवट सोडून देण्यात आला आहे. या कालव्याचे पाणी नदीत सोडणे गरजेचे होते. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी उर्ध्व वर्धा डावा कालवा विभागाकडे कालव्याची वितरिका नदी सोडण्याची लेखी विनंती केली होती; पण संबंधित विभागाने टाळाटाळ करीत समस्या निकाली काढली नाही. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केल्याने या कालव्याचे पाणी दोन दिवसांपूर्वी सोडले. दुरूस्ती न करताच पाणी सोडल्याने कैलेकु यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचले. शिवाय १३ शेतकऱ्यांच्या शेतात तळे साचले. शेतकऱ्यांनी संबंधित विभागात धाव घेतली असता वितरिका बंद करण्यात आली; पण तोपर्यंत पिकांची धुळधाण झाली होती. या प्रकरणी उपविभागीय कार्यकारी अभियंता गावंडे यांना माहिती देण्यात आली; पण कारवाई करण्यात आली नाही. १५ दिवसांपूर्वी पीडित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देत बुजलेल्या वितरिकेच्या दुरूस्तीची मागणी केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले. आता शेतकऱ्यांनी हरकत घेतली असताना लघु कालव्यातून पाणी सोडले. शेतकऱ्यांनी आमदार अमर काळे यांचीही भेट घेत न्यायाची मागणी केली. उर्ध्व वर्धा डाव्या विभागांतर्गत सात लघु कालवे व एक मुख्य वितरिका आहे. या विभागात पाणी सोडण्यासाठी एकच कर्मचारी असून त्याच्याकडे ७ ते १३ किमीचे अंतर दिले. यामुळे रात्री-अपरात्री कालव्यात तांत्रिक अडचण आल्यास त्याचे त्वरित निसरण होत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)हातचे पीक जाण्याच्या धास्तीमुळे शेतकरी चिंतेतअंबिकापूर शिवारातील विनोद कैलुके ३ एकर तूर, कृष्णराव खोंडे २ एकर, मारोतराव कैलुके ३ एकर, रामदास कैलुके ६ एकर, प्रदीप काळे १० एकर, साहेबराव खोंडे ५ एकर, अनिल खोंडे १४ एकर, विठ्ठल गवळीकर ३ एकर, किसन कैलुके ७ एकर, रमेश कैलुके २ एकर, किसना कैलुके २ एकर, नारायण कैलुके ६ एकर आणि विनायक कैलुके २ दोन एकर अशा ६५ एकर शेतातील तूर पीक खराब झाले आहे. हातचे पीक जाणार असल्याने शेतकरी धास्तावले आहे. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना भरपाई देणे गरजेचे झाले आहे.कॅनलच्या पाण्यामुळे १४ एकरातील तूर पूर्णत: खराब झाली आहे. शेतात पाणी साचले आहे. यात सुमारे २ लाखांच्या वर नुकसान झाले. संबंधित विभागाने हे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी अंबिकापूर येथील पीडित शेतकरी प्रवीण खोंडे यांनी केली आहे.इतर शेतकऱ्यांची मागणी असल्याने पाणी सोडण्यात आले; पण आता या वितरिकेचे पाणी वितरण पूर्णत: बंद केले आहे. या कॅनलचे अखेरचे टोक शेतकऱ्याने बुजविले आहे. या वितरिकेचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्यासाठी टेलिंग मशीन पाठविली होती. या मुख्य वितरिकेचे गेट रात्री कुणीतरी सोडल्याने समस्या उद्भवली. गत नऊ वर्षांपासून या कॅनलच्या वितरिकेवर पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.- पी.बी. खुजे, सहायक अभियंता, उर्ध्व वधा डावा कालवा, उपविभाग, आर्वी.