शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१८ जागांकरिता १२६ इच्छुकांचे नामांकन अर्ज

By admin | Updated: September 4, 2016 00:30 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

हिंगणघाट बाजार समिती निवडणूक : विक्रीच्या तुलनेत ५७ अर्ज कमीहिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीकरिता एकूण १८३ नामांकन पत्राची विक्री झाली असली तरी शेवटच्या तारखेपर्यंत १२६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विक्रीच्या तुलनेत एकूण ५७ अर्ज कमी झाल्याने त्यांच्या खरेदीदारांची बाहेरच मनधरणी झाली असावी, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीत खरी रंगत येणार असल्याची चर्चा जोरात आहे. या बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी सर्वाधिक संचालक सहकारी संस्था मतदार संघात आहे. या संघात ११ जागा असून यापैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागास प्रवर्ग, १ विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आहे. ग्रामपंचात मतदार संघातील ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती व १ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव आहे. तर व्यापारी अडते मतदार गटातून २ व हमाल मापारी गटातून १ अशा एकूण १८ संचालक मंडळासाठी ८ आॅक्टोबरला मतदान होणार असून ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार गटात ८६७ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ६०४, व्यापारी अडते गटात ३९६ मतदार तर हमाल मापारी गटात ३८६ मतदार आहे. या निवडणुकीकरिता आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जात शिवसेना समर्थित पॅनल, भाजपा समर्पित आमदार समीर कुणावार गटाचे पॅनल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व शेतकरी संघटनेच्या मधुसूदन हरणे यांच्या सत्तारूढ आघाडीच्यावतीने अनेक इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत सर्वच गट पॅनलने नेते व इच्छुकांना दुखवायचे नाही, अशा धोरणाचा अवलंब केल्याने अनेकांनी एका पेक्षा अधिक गटात उमेदवारी अर्ज दाखल केली आहे; परंतु नामांकन अर्जांची छाणनी होवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उरलेल्या उमेदवारात लढत होवून निवडणुकीत खरी रंगत भरणार असल्याचे चित्र आहे. अख्या विदर्भात नावलौकीक असलेल्या या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर विदर्भाचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.(तालुका प्रतिनिधी)