लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा बस स्थानक परिसरातून १ लाख २८ हजारांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी अमरावती येथील एका युवकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.संजय अशोक टेकाडे (२८) रा. हनुमान वॉर्ड, अमरावती हा गांजा नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी बसस्थानक गाठत त्याच्या जवळील साहित्याची पाहणी केली. यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. गांजाचे वजन १२ किलो ८३० ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संजय टेकाडे याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसडीपी माधव पडिले, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्यासह पीएसआय पपीन रामटेके, सचिन धवाळे, मंगेश झामरे, ज्ञानेश्वर निमजे, आकाश कांबळे, नितेश बावणे, प्रेमदेव सराटे, गितेश देवघरे यांनी केली.
सव्वा लाखांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:25 IST
वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा बस स्थानक परिसरातून १ लाख २८ हजारांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी अमरावती येथील एका युवकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
सव्वा लाखांचा गांजा जप्त
ठळक मुद्देअमरावती येथील युवक अटकेत : पोलिसांकडून शहर बसस्थानकावर कारवाई