वर्धा : आॅटोद्वारे गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. यावरून पिपरी नाका येथे नाकाबंदी करीत आॅटोसह १ लाख २३ हजारांचा गावठी दारूसाठा जप्त करण्यात आला. एका आॅटोद्वारे पांढरकवडा पारधी बेडा येथून वडर झोपडपट्टी आर्वी नाका येथे गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून रामनगर पोलिसांनी नाकाबंदी करीत आॅटो क्र. एमएच ३२ सी ५२५६ ची तपासणी केली. यात दोन डबकीमध्ये २८ लिटर गावठी दारू आढळून आली. यावरून महादेव सिताराम मुडे (२०) रा. पिपरी (मेघे) यास ताब्यात आॅटोसह १ लाख २३ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मगर यांच्या मार्गदर्शनात शंकर भलावे, आकाश चुंगडे, नरेंद्र कांबळे, निलेश करडे, डी.बी. पथक व मार्शलचे राजेंद्र ढगे, राजेंद्र निवलकर यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)
वाहनासह १.२३ लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Updated: October 20, 2016 00:34 IST