शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डाक घरातून १.१९ लाख लंपास

By admin | Updated: February 3, 2017 01:52 IST

येथील डाक व तार कार्यालयातील मुख्य प्रवेश द्वाराच्या कुलपासह कोंडा गॅस कटरने कापूस चोरट्यांनी तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रुपये लंपास केल्याची घटना

चोरीकरिता गॅस कटरचा वापर : चोरीत टोळीचा संशय सेवाग्राम : येथील डाक व तार कार्यालयातील मुख्य प्रवेश द्वाराच्या कुलपासह कोंडा गॅस कटरने कापूस चोरट्यांनी तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. ही चोरी करणे कुण्या एका चोरट्याचे काम नसून याकरिता टोळीच कार्यरत असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता चोरट्यांनी एकाच वेळी दोन दरवाज्याचे कुलूप कटरने कापल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील डाक कार्यालयात चोरी झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता चोरट्यांनी प्रारंभी कार्यालयातील खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. यानंतर आतच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कार्यालयातील लोखंडी तिजोरी फोडली. या तिजोरीतून १ लाख १९ हजार ३१८ रूपये लांबविले. या प्रकरणी प्रभारी पोस्ट मास्टर अलका अनंत झिलटे यांच्या तक्रारीवरुन कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदुरकर चौकशी करीत आहे. ही चोरी करण्यात कुण्या एका चोरट्याचा नाही परिसरात एखादी टोळी कार्यरत असावी, असा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.(वार्ताहर)