शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

११४ गोवारी बांधवाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

By admin | Updated: January 23, 2017 00:45 IST

काबाड कष्ट करून जीवन जगणारा गोवारी समाज मागील सात दशकांतही आपली प्रगती करू शकला नाही.

रामदास तडस : मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन पुलगाव : काबाड कष्ट करून जीवन जगणारा गोवारी समाज मागील सात दशकांतही आपली प्रगती करू शकला नाही. आदिवासी समाजात समावेश असतानाही या समाजाला आरक्षणाचा किंवा शासकीय सवलतीचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही. १९८५ मध्ये गोवारी समाज हा श्रीमंत असल्याचा कांगावा करून लालफित शाहीतील काही अधिकाऱ्यांनी या समाजाला शासकीय योजनांच्या लाभापासून दूर ठेवले. त्यामुळे आपल्या न्याय मागण्यासाठी या समाजाने संघर्षातून संघटना निर्माण केली. आपल्या न्याय मागण्यासाठी २३ नोव्हेंबर १९९४ साली नागपूर अधिवेशन सुरू असताना ११४ गोवारी बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या ११४ गोवारी बांधवाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. गोवारी समाजाच्या न्याय मागण्यांचा आपण शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन रामदास तडस यांनी आदिवासी गोवारी जमात समाज मेळाव्यात दिले. स्थानिक गुरूनानक मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी गोवारी समाज संस्था नागपूरचे अध्यक्ष शालिक नेवारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मनोहर शाहारे (कळंब), नामदेव नेहारे (वर्धा), मलकापूरच्या सरपंच साधना नेहारे, भाजपाचे नितीन बडगे, प्रभाकर शहाकार, दामोदर नेहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. मेळाव्यात आदिवासी गोवारी जमातीच्या सामाजिक, चालिरिती, संस्कृती या विषयावर गोंदिया येथील दामोदर नेवारे यांनी मार्गदर्शन केले. जमातीवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द शासकीय, संविधानिक व न्यायालयीन लढा या विषयावर रूपेश चामलाटे यांनी प्रकाश टाकला. डॉ. आनंद नेहारे यांनी स्वयंरोजगार व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी राहुल खडतकर, चंदु साहारे, वासुदेव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी खा. तडस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार ठाकरे यांनी केले. संचालन गजानन ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिक लसुंते, दिनेश कुसराम, मंगेश ठाकरे, मंगेश नेवारे, मंगेश चौधरी, रूपराव राऊत, गजानन ठाकरे, नरेंद्र बोरकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)