शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

By admin | Updated: February 8, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : रिंगण तयार; अपक्षांना मिळाले निवडणूक चिन्ह वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता. यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे आता रिंगणात ८१८ उमेदवार असून त्यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले झाले असले तरी थेट लढतींकडे मतदारांचे लक्ष आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासह आज अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळताच त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेकरिता नामांकन दाखल करणाऱ्या एकूण ४७ तर पंचायत समितीकरिता अर्ज करणाऱ्या एकूण ६४ इचछुकांनी नामांकन परत घेतले. यामुळे येत्या १६ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता २८९ तर पंचायत समितीच्या १०० जागांकरिता ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताच प्रचार सुरू केला, तर आज अपक्षांना चिन्ह मिळाल्याने त्यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. ८) फुटणार आहे. काही ठिकाणी पक्ष आणि अपक्षातच थेट लढत असल्याने होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निकालाअंतीच कळणार आहे. निवडणूक जाहीर झाली त्या काळापासूनच रिंगणात उतरण्याकरिता अनेकांनी बाशिंग बांधले होते. यात अनेकांनी नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आठही तालुक्यात एकूण ९९६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची छाननी झाली. त्यात त्रुट्यांमुळे तब्बल ३३ इच्छुकांचे नामांकन बाद ठरले झाले. या छाननीत काही पक्षांच्या उमेदवारांनाही फटका बसला. छाननी अंती एकूण ९६६ नामांकन शिल्लक राहिले होते. त्यातील काहींनी आज अनेकांनी आपले अर्ज परत घेतले. या निवडणुकीत काहींनी पक्षासोबत बंडखोरी करीत दंड थोपटले. पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीने काहींनी माघार घेतली तर काहींचे नामांकन कायमच आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे. विरूळ गटावर आक्षेप आर्वी तालुक्यातील विरूळ जिल्हा परिषदेच्या काही इच्छुकांकडून नामांकन अर्ज परत घेण्याची प्रक्रीया सुरू असताना काही अडचणींवरून आक्षेप घेतला. यामुळे येथे वाद उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी येथील प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. सदर प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले आहे. यावर येत्या १० तारखेला सुनावणी होणार असून त्यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या गटात किती उमेदवार राहणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र या गटांतर्गत येत असलेल्य गणांची स्थिती स्पष्ट झाली आहे.