शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

देवळीच्या गॅस एजन्सीला १.१० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:52 IST

देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीच्या नावाने इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वितरणाची एजन्सी दिली आहे. परंतु, याच एजन्सीद्वारे ग्राहकांना पाहिजे तशी सेवा दिली जात नसल्याची तक्रार प्राप्त होताच सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाहणी केली.

ठळक मुद्दे१२ त्रुटी आढळल्या : वरिष्ठांकडून झाली होती पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीच्या नावाने इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वितरणाची एजन्सी दिली आहे. परंतु, याच एजन्सीद्वारे ग्राहकांना पाहिजे तशी सेवा दिली जात नसल्याची तक्रार प्राप्त होताच सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाहणी केली. यावेळी त्यांना सुरक्षेसह विविध प्रकारच्या एकूण १२ त्रुटी आढळल्या. त्याच त्रुटी पुढे करीत देवळीच्या गॅस सिलिंडर वितरण एजन्सीला इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडचे व्ही. डी. सातदिवे यांनी १ लाख १० हजार ३३० रुपयांचा दंड ठोठावला आहे.गॅस सिलिंडर धारकांना घरपोच सिंलिडर पोहोचविले जात नाही. आॅन लाईन नोंदणी करूनही दहा-दहा दिवस ग्राहकांना गॅस सिलिंडर दिल्या जात नाही. गरीब व गरजुंच्या वाट्याचा उपलब्ध गॅस सिलिंडरचा साठा धनाड्य व्यावसायिकांना चढ्या दराने पुरविला जातो, अशा आशयाच्या तक्रारी युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेला प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांची समस्या लक्षात घेता युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने सदर समस्या निकाली निघाव्या म्हणून सुरूवातीला देवळीच्या गॅस सिलिंडर वितरण एजन्सीला व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर संतप्त नागरिकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी घेतली.तसेच योग्य कार्यवाहीसाठी इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या नागपूर येथील अधिकाºयांशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला केंद्रस्थानी ठेवून इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या अधिकाºयांनी अचानक देवळी गाठून गोपनिय माहिती घेत देवळीच्या एजन्सीच्या कार्यप्रणालीची व तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली. याच पाहणीत सदर अधिकाºयांना एकूण १२ त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्याच त्रुट्यांना पुढे करून देवळीच्या सदर गॅस एजन्सीला १ लाख १० हजार ३३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर आदेशावर इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेड नागपूरचे व्ही. डी. सातदिवे यांची स्वाक्षरी आहे. या आदेशामुळे देवळीच्या इंडियन गॅस एजन्सीच्या संचालकांच्या अडचणीत भर पडली आहे.त्याच त्रुट्यांच्या अधारे परवाना रद्द होऊ शकतोइंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडच्या नागपूर येथील अधिकाºयांनी ज्या १२ त्रुट्याना पुढे करून देवळीच्या गॅस एजन्सी धारकावर दंडात्मक कारवाई केली, त्याच १२ त्रुट्यांच्या आधारे सदर एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करता आली असती. सदर त्रुट्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आणि ज्या कराराच्या आधारे तसेच अर्टी व शर्तीला अधिनस्त राहून एजन्सीमालकाने काम करणे होते त्यालाच फाटा दिला आहे. ही निंदनिय व गंभीर बाब आहे, असे पत्रकार परिषदेत अ‍ॅड. अरुण येवले यांनी सांगितले.राजकीय दबाव तंत्राचा वापरइंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीला अधिकृत वितरक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, या एजन्सीचा संपूर्ण कारभार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या वरद हस्ताने चालतो. याच एजन्सीद्वारे वितरणीत करण्यात आलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत मोठा गैरप्रकार झाला आहे. लाभार्थ्यांकडून अतिरिक्त ५०० रुपये घेतले जात आहेत. इंडियन आॅईल कंपनी प्रशासनाने केलेली दंडात्मक कारवाई केवळ नाममात्र आहे. सदर एजन्सीचा परवानाच रद्द करून गैरप्रकार करणाºयांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तशी आमची मागणीही आहे. इतकेच नव्हे तर सदर विषय उचलणाºया युवा परिवर्तन की आवाजच्या देवळीच्या कार्यकर्त्यांना सध्या विविध प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सदर एजन्सीचा परवाना रद्द करून नागरिकांना सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी पत्रकार परिषदेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी केली. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. अरुण येवले, स्वप्नील कांबडी, प्रितेश इंगळे, गौरव वानखेडे, पलाश उमाटे आदींची उपस्थिती होती.