शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

सेविका व मदतनिसांची ११ पदे रिक्त

By admin | Updated: January 1, 2015 23:07 IST

शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र सुरू केले़ शिवाय यातून कुपोषण दूर सारण्याचे प्रयत्नही होत आहेत; पण शासनाच्या

वर्धा तालुक्यातील स्थिती : पूर्व प्राथमिक शिक्षण व कुपोषणमुक्तीला अडथळावर्धा : शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्र सुरू केले़ शिवाय यातून कुपोषण दूर सारण्याचे प्रयत्नही होत आहेत; पण शासनाच्या या प्रयत्नांना रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे दिसते़ वर्धा तालुक्यातील तब्बल ११ पदे रिक्त असल्याने बालकांच्या संगोपन, पूर्व प्राथमिक शिक्षण व कुपोषण मुक्तीच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़बालकांचे कुपोषण दूर करता यावे, पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून पौष्टीक आहार व खाद्य पुरवठ्यावर विशेष भर दिला जात आहे. बालकांना शिक्षण देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडी सेविका व तिच्या सोबतीला मदतनिस यांची निवड करण्यात आली आहे. साधारण ३ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी तालुक्यातील अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात एक अंगणवाडी सेविका व मदतनिस कार्यरत असते़ वर्धा तालुक्यात २७० अंगणवाडी केंद्र तर ७ मिनी अंगणवाड्या आहे; पण गत काही महिन्यांपासून ३ अंगणवाडी सेविका तर ८ मदतनिसांची पदे रिक्त आहे़ यामुळे त्या अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने पूर्व प्राथमिक शिक्षण व संगोपणाकरिता प्रारंभी बालवाडी सुरू केली. त्यात सुधारणा करून अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली़ अंगणवाडीचे काम योग्यरित्या चालावे याकरिता केंद्र व राज्य शासनाद्वारे मानधन तत्वावर सेविका व मदतनिसांची नियुक्ती केली़ संबंधित ग्रा़पं़ क्षेत्रात येणाऱ्या महिलांची अंगणवाडी सेविका व मदतनिस म्हणून निवड केली जाते.(तालुका प्रतिनिधी)