शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

११ गावातील नागरिकांना बांधकाम करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:45 IST

आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देदोन कि.मी.पर्यंत बांधकामास बंदी : संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात बांधकाम निर्माण कार्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश नुकताच निर्गमीत केला आहे. त्यामुळे परिसरातील अकरा गावांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.संरक्षण विभागाच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाने यांनी नाचणगाव, गुंजखेडा, लक्ष्मी नारायणपूर, आगरगाव, सोनेगाव, मुरदगाव, मलकापूर, कवठा (रेल्वे), कवठा (झो), नागझरी, येसगाव या गावांना हा आदेश लागू केला आहे. ग्रामपंचायत सचिवांनी देवळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या सहीचे आदेशानुसार या गावाना यांची माहिती दिली आहे. विस्फोट व अतिस्फोट पहाता या भांडारालगतच्या अनेक गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे इतकेच नव्हे तर वेळ प्रसंगी वित्त व जीवहानीचा सामना देखील करावा लागला. ही परिस्थिती पहाता सुरक्षेच्या दृष्टीने भांडारालगतच्या १३ गावात कुठलेही बांधकाम करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच राहिल. मागील दोन वर्षात या दारूगोळा भांडारात झालेले अग्नीस्फोट व विस्फोट व त्यात झालेली जीव व वित्तहानी यामुळे सदर निर्णय घेण्यात आला असे समजते. स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडार जवळपास ७ हजार एकर परिसरात पसरलेले आहे. १५० ते २०० अधिकारी व जवळपास ४ हजार स्थानिक कामगार कार्यरत आहेत. या भांडारात विस्फोटक व विस्फोटक शस्त्रसाठा असल्यामुळे लहान मोठ्या अनेक दुर्देवी घटना घडल्या. परंतु १ मे १९८९ मध्ये झालेला भयावह विस्फोट व त्यामुळे पसरलेली भयानक अग्नी तांडवामुळे संपूर्ण विदर्भ हादरून गेला होता. इतकेच नव्हे तर भांडार संरक्षक भिंती लगतच्या अनेक गावाचे झालेले नुकसान पहाता परिसरातील १३ गावात कुठलेही बांधकाम व निर्माण कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येवून या गावाचे पुनर्वसन करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी या गावाचे पुनर्वसन करण्याचे आदेशही दिले होते. परंतु पुनर्वसनाचे घोडे पेड खातच राहिले.मागील ३० मे २०१६ व नुकताच २० नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या अग्नीस्फोट व विस्फोट व झालेली जीवहानी पहाता पुन्हा भांडार परिसरालगतच्या १० गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला.वारंवार घडणाºया घटनामुळे भांडारालगतच्या गावात यापूर्वीच निर्माण कार्यावर बंदी घालण्यात आली होती.