शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत आजपासून १० वे सत्यशोधकी साहित्य संमेलन

By admin | Updated: February 11, 2017 00:45 IST

दहावे सत्यशोधकी साहित्य संमेलन ११ व १२ फेब्रुवारीला वर्धा येथील शिव वैभव सभागृह (व्यंकटराव गोडे साहित्य नगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे

व्यंकटराव गोडे साहित्य नगरी सज्ज वर्धा : दहावे सत्यशोधकी साहित्य संमेलन ११ व १२ फेब्रुवारीला वर्धा येथील शिव वैभव सभागृह (व्यंकटराव गोडे साहित्य नगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व संशोधक डॉ. गेल आॅम्व्हेट, सातारा , तर स्वागताध्यक्षपदी डॉ. शिरीष गोडे राहतील. या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ संपादक, विचारवंत व नाट्यलेखक ज्ञानेश्वर महाराव (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मुख्य आयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी दिली. आयोजनाकरिता समितीचे अध्यक्ष गुणवंत डुकरे, उपाध्यक्ष कपिल थुटे, सचिव राजेंद्र कळसाईत, जनार्दन देवतळे, सुधीर गवळी परिश्रम घेत आहे. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव फाळके, उत्तमराव पाटील, महिला प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारूलता टोकस, सत्यशोधक साहित्य, संस्कृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीराम गुंदेकर, माजी संमेलनाध्यक्ष नागेश चौधरी, प्रा. नूतन माळवी उपस्थित राहतील. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. गेल आॅम्व्हेट यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. प्रमुख पाहुणे म्हणून खा. रामदास तडस, अभ्युदय मेघे, विजय आगलावे, प्रा. जैमिनी कडू, दिलीप घावडे, किशोर माथनकर, आप्पासाहेब मैंद, अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे उपस्थित राहतील. प्रा. माधव गुरनुले अहवाल वाचन करतील. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून राज्यभरातील नामवंत लेखक, विचारवंत व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)