शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१०० किलो प्लॉस्टीक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:44 IST

प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देसेलू नगरपंचायतीची कार्यवाही : दुकान मालकांना ठोठावला दंड

ऑनलाईन लोकमतवर्धा : प्लास्टिकमुक्त शहराकरिता शासनाच्यावतीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात सेलू नगर पंचायतीत प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १०० किलो प्लास्टिक जप्त करीत दंडाची वसुली केली आहे.येत्या गुढीपाडव्यापर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचे शासनाने ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक जप्तीची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. सेलू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५० व्यावसायिक प्रतिष्ठान व दुकानदार टाकलेल्या धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक जप्त करून प्रति व्यावसायिक १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.सेलू नगर पंचायतीचे कार्यालय अधीक्षक दिनेश बुधे, प्रशांत रहांगले, नारायण दांडेकर, प्रभाकर करनाके, अक्षय निमजे, सुधाकर भलावी, आशिष ढोबळे, रामाजी मुळे या प्लास्टीक जप्ती पथकाने आतापर्यंत चहा ग्लास, प्लास्टीक वाटी, पाण्याचे ग्लास, प्लास्टीक पिशव्या अशा प्रकारचे साहित्य जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली.हिंगणघाटात जप्ती मोहीमऑनलाईन लोकमतहिंगणघाट : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे. याच मोहिमेत कमी माईक्रॉनच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा, यासाठी आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात आरोग्यास अपायकारक प्लास्टीक वापर होत असल्याचे दिसून आले. नगर पालिकेच्या चमूने केवळ दोनच दिवसात ३४ दुकानातून ५० किलो. कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक दंडासह जप्त केले.शहरात नगर परिषदेच्यावतीने कमी मायक्रॉनच्या प्लास्टीक पिशव्या जप्तीची कारवाई सुरू असून विविध व्यावसायिकांकडून २० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून दंडही वसूल करण्यात आला.सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ हिंगणघाट सुंदर हिंगणघाट या मोहिमेला गती देण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई आता सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेला करीत आहे. कधी कधी तिसऱ्यांना अर्थात दुपारीही केल्या जात असून स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातल्या जात आहे. ओल्या आणि सुका कचऱ्यांकरिता चौकाचौकात कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार नगर परिषदेनेही मोहीम आखली असून शाळा शाळातून अशा जागृती मोहिमेवर बळ दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांची रॅली, मेळावे काढून सक्रीय होण्यासाठी पालिका प्रयत्नशिल असून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. स्वच्छ शहराकरिता प्लास्टीक निर्मूलनाची गरज असून मोठ्या प्रमाणात हाच कचरा जास्त धोक्याचा असल्याचे दिसून आले आहे.