शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सिकलसेलचे १० हजार वाहक

By admin | Updated: December 31, 2015 02:15 IST

गंभीर व अनुवांशिक सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात

\साडेसहा लाख नागरिकांची तपासणी : वर्धा तालुक्यात सर्वाधिक रुग्णगौरव देशमुख वर्धागंभीर व अनुवांशिक सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात २००९ पासून तर जिल्ह्यात २०१०-११ पासून सुरू झाला. जिल्ह्यात १ ते ३० वयोगटातील ६ लाख ५८ हजार ६८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ७९८ सिकलसेलग्रस्त रुग्ण तर ९ हजार ९८२ सिकलसेल वाहक आढळून आलेत. सदर रुग्णांना उपचारासाठी शासनाकडून औषधी पुरवठा होत आहे. सिकलसेल आजारात लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलून कोयत्याच्या आकाराच्या बनतात. साधारण रक्तपेशी गोल असल्याने त्या शरिराच्या सर्व भागात रक्त वाहून नेतात. सिकलसेल आजार असलेल्या व्यक्तीच्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांतून रक्त वाहून नेऊ शकत नाही. त्या घट्ट आणि चिकट होतात. ते रक्तवाहिन्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण करतात. अवयवांना पुरेसे आॅक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात. सिकलसेलग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांच्या रक्ताची तपासणी करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य उपकेंद्र आदी ठिकाणी होत आहे. तीन पद्धतीने केली जाते सिकलसेलची तपासणीसिकलसेल आजाराची तपासणी सोल्युबिलिटी, इलेक्ट्रोफोरेसिस आणि एचपीएलसी या पद्धतीने केली जाते. सोल्युबिलिटी चाचणी ही सर्व रुग्णालयांमध्ये होते; पण इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी आर्वी, हिंगणघाट व वर्धा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणीच केली जाते.एचपीएलसी तपासणी मात्र नागपूर येथील एक शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील सर्वोपचारमध्ये करण्यात येते. आई व वडील हे दोन्ही सिकलसेलग्रस्त वा वाहक असतील तर अपत्यांनाही हा आजार होतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांचा आपापसातील विवाह टाळणे गरजेचे आहे.औषधोपचाराकरिता सहाय्यतासमाज सिकलसेल मुक्त करण्यासाठी जनजागृती करणे तसेच या रुग्णांना नेहमी रक्त द्यावे लागत असल्याने रक्तदान करणे गरजेचे आहे. लग्नापूर्वीच सिकलसेल रक्त तपासणी करणे हाच निरोगी अपत्याला जन्म देण्याचा एकमेव व साधा उपाय आहे. यामुळे जोडप्यांनी सिकलसेलची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सदर रुग्णांना शासनाकडून आर्थिक मदतही केली जाते. रुग्णाला मोफत रक्त देण्यासोबतच औषध व उपचाराकरिता प्रशासन दरमहा ६०० रुपयांची मदत करते. मोफत तपासणी, ओळखपत्र, बालरूग्ण, अतिदक्षता विभागासह विविध सवलती दिल्या जातात. हा रक्ताचा अनुवांशिक आजार असून कुटुंबातील सर्वांनी रक्त तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हा आजार बरा होणारा नसला तरी औषधोपचार व आरोग्याची काळजी घेतल्यास आटोक्यात आणता येतो. औषधोपचार व रक्त तपासणी नि:शुल्क केली जाते.- डॉ. डी. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धाताप येणे, छातीत दुखणे, श्वासोच्छवास त्रास होणे, थकवा, अशक्तता, निस्तेजपण, पोटदुखी, सांधे दुखी, डोके दुखी, झाव लागणे, वेदनाशामक गोळ्यांनी कमी न होणाऱ्या वेदना अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घेतली पाहिजे.- तृप्ती देशमुख (वरखडे), औषध निर्माण अधिकारी, प्रा.आ. केंद्र, मांडगाव.