शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवनार, केळझर व बोरच्या विकासाकरिता १० कोटी

By admin | Updated: April 11, 2017 01:15 IST

वर्धा विधानसभा क्षेत्रातील केळझर, पवनार या गावांना प्राचीन इतिहास आहे. तसेच वाघांचे सुरक्षित स्थळ म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प नावारुपास येत आहे.

पंकज भोयर यांची माहिती : केळझरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमीतही होणार सुविधा वर्धा : वर्धा विधानसभा क्षेत्रातील केळझर, पवनार या गावांना प्राचीन इतिहास आहे. तसेच वाघांचे सुरक्षित स्थळ म्हणून बोर व्याघ्र प्रकल्प नावारुपास येत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तीनही ठिकाणाचा विकास करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. या पर्यटन स्थळांचा विकास करण्याकरिता प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत या गावांच्या विकासासाठी १० कोटी २९ लक्ष ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती डॉ. पंकज भोयर यांनी दिली. एक चक्राकारनगरी म्हणजे केळझर गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा दत्तक घेतले आहे. यामुळेच गावाच्या विकासासाठी ४ कोटी ९५ लक्ष १९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत सिध्दीविनायक मंदिर परिसरात पर्यटकांकरिता सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी १ कोटी ९२ लक्ष ३२ हजार रुपये खर्च केल्या जाणार आहे. केळझर येथील हजरत पीर बाबा टेकडीचा विकास व पर्यटन सुविधा यासाठी १ कोटी ४१ लक्ष ९४ हजार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमी परिसरात सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी १ कोटी ३७ लक्ष ३६ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. सल्लागार वास्तुविशारद व आकस्मिक निधी म्हणून २३ लक्ष ५७ हजार रुपयांचा निधी सुरक्षित ठेवण्यात आला आहे. बोरधरण येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ३ कोटी ८९ लक्ष ८२ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये बोरधरण परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत बोटिंग, हेल्थ क्लब अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. या निधीमुळे या तीन्ही गावांचा विकास होणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिली आहे.(प्रतिनिधी) पवनार नदीघाटाकरिता १.३३ कोटी पवनार येथील विकासासाठी १ कोटी ३६ लक्ष ७५ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. या निधी अंतर्गत पवनार येथील नदी घाट परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी ५८.५४ लक्ष रुपये, नदी घाटावर क्रॉक्रींट स्टेप्सच्या बांधकामाकरिता ३३ कोटी १० हजार व नदीघाटावर लॅन्ड स्केपिंग करण्यासाठी ४५ लक्ष ११ हजार रूपये खर्च केला जाणार आहे.