शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:56 IST

नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देभेसळयुक्त पदार्थांची विक्री : गोदामात अस्वच्छतेत तयार होतात अनेक खाद्यपदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सण-समारंभात मिठाई व तत्सम पदार्थांना मोठी मागणी असते. हे ओळखून खवय्यांकडून भेसळयुक्त मिठाई, खाद्यपदार्थ तयार केले जातात. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई सेवनामुळे गंभीर आजारांना सामारे जावे लागू शकते. याकरिता ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.शहरात शेकडोवर परप्रांतातील खवय्यांनी स्वीट मार्टची दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून येथेच मिष्टान्न व इतर खाद्यपदार्थ तयार केले जातात. यात खोव्यापासूनही मिष्टान्न तयार केले जाते. वर्ध्यात खोव्याचे फारसे उत्पादन होत नसताना मिष्ठान्न वापरासाठी खोवा येतो कोठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे. फरसाण तयार करताना भेसळयुक्त तेल, शिवाय एकाच तेलात अनेक प्रकारचे पदार्थ तळले जात असल्याने गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होतो.शहरातच अनेक विक्रेत्यांची खाद्यपदार्थ तयार करण्याची गोदामे आहेत. येथेही कमालीची अस्वच्छता असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे.खाद्यपदार्थ, मिष्ठान्न तयार करणाऱ्यांचा पोषाख अतिशय घाणेरडा असतो. खाद्यपदार्थ तयार करणाºयाची नियमित आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, मिठाई विक्रेत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचाही कानाडोळा होत आहे.वाटाण्यापासून तयार होते बेसणशहरातील अनेक उपाहारगृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चण्याच्या डाळीऐवजी वाटाण्यापासून निर्मित भेसळयुतक्त बेसणाचा वापर होतो. मागील अनेक दिवसांपासून विक्रेत्यांचा हा गोरखधंदा सुरू असून ग्राहकांच्या डोळ्यात धूळ झोकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थांची धडक तपासणी मोहीम राबविणार असून याअंतर्गत परवाना नूतनीकरण, नोंदणी आदी बाबी पडताळण्यासोबतच खाद्यपदार्थांचे देखील नमुने घेतले जाणार आहेत. व्यावसायिकांनी ऑनलाईन नोंदणी करीत परवाने प्राप्त करावे.- रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.