साहित्य :सारख्या तोंडाच्या 2 बाटल्या, कोमट पाणी, गार पाणी, लाल शाई, निळी शाई, जाड प्लॅस्टिकचा तुकडा.कृती:1. एका बाटलीत चार थेंब लाल शाई टाका. मग ती बाटली गार पाण्याने काठोकाठ भरा. पाणी लाल दिसेल.2. मग बाटलीच्या तोंडावर एक जाड प्लॅस्टिकचा तुकडा ठेवा. 3. दुसर्?या बाटलीत चार थेंब निळी शाई टाका. मग ती बाटली कोमट पाण्याने काठोकाठ भरा. 4. लाल पाण्याची बाटली प्लॅस्टिकचा तुकडा पक्का ठेवत उलटी करा. निळ्या पाण्याच्या बाटलीच्या तोंडावर ठेवा.5. बाटल्यांची जागा न हलवता हलकेच प्लॅस्टिकचा तुकडा काढून घ्या. लाल शाईचे पाणी निळ्या पाण्यात मिसळते का पहा. 6. हीच कृती लाल पाणी खालच्या बाटलीत आणि निळे वरच्या बाटलीत असे करून पहा.
कोमट पाणी हलकं तर गार पाणी जड, असं का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:46 IST
गरम जड की गार जड?
कोमट पाणी हलकं तर गार पाणी जड, असं का ?
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा