शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शिक्षकांनाही Online जाताना प्रश्न पडत आहेत, हे प्रश्न कोणते? ते कसे सोडवावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 17:28 IST

‘व्हर्चुअल वर्ग’ चालवण्यासाठी करून पाहाता येतील असे प्रयोग

ठळक मुद्देशिकवण्याआधी शिकण्याचंच टेन्शन

ऑनलाइन शाळा आता सर्वत्र सुरु झाल्या. त्यात शिक्षकांना मुख्यत्वे काही शंका आहेत, एक प्रकारची धास्ती आहे, धाकधुक आहे की, नक्की आपण जे करतोय ते मुलांना कळत असेल का? आपले प्रयत्न पुरेसे आहेत का? इंटरेस्टिंग आहेत का? अजून काय करायला हवं? काही शंका आणि प्रश्न बहुतांश सर्वानाच पडलेले दिसतात. काहींना जुन्या शिकवण्यातल्या सुंदर गोष्टी आठवतात आणि ती मजा या तांत्रिक जोडणीत नाही असंही त्यांना वाटतं. * एक म्हणजे बहुतांश शिक्षकांना वाटतं की, मुलांसोबतचा दंगा, मस्ती, त्यातला उत्स्फुर्तपणा, जिवंतपणा आता ऑनलाइन शिकवण्यात नाही. शाळेतले ते दिवस, तो किलबिलाट, ती ऊर्जा अनेक शिक्षकांना कातर कातर करतेय.* आपण पूर्वी जसं शिकवत होतो ते आणि आता जसं शिकवावं लागतं ते, ही नव्यानं शिकवण्याची नवी रीत शिकत असतानाच शिकवणं, यात शिकवण्यापेक्षा शिकण्याचंच टेंशन अनेकांना आलेलं आहे.* अनेकांना अजून नीट वेळेचं नियोजन जमत नाही. घरकाम, शाळा, शाळेची तयारी, पीपीटी, व्हिडीओ काढणं, लिंक पाठवणं, शूट करणं, ऑनलाइन असाइनमेण्ट तपासणं यात दिवस सरतो पण काम संपत नाही. दिवस पुरत नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेण्टचा काटा चुकलेला आहे.* अनेकांना वाटतं की हे ऑनलाइन इंटरॅक्शन अतिशय कोरडं कोरडं होतंय, त्यात काही जान नाही.* काहीजण म्हणतात की आपण जे शिकवतोय ते मुलांना कळतंय की नाही हेच कळत नाही.* काहीजणांना असंही वाटतं की या ऑनलाइन शिकण्यातलं नाविन्य संपलं की मुलांचाही असं शिकण्यातला रस उडून जाईल. त्यांना ऑनलाइन बसवून ठेवण्यासाठी सतत प्रेरणा दद्यावी लागेल.* काहीजणांच्या मते ऑनलाइन शिकवण्यासाठीच्या अनेक गोष्टी माहिती, व्हिडीओ ऑनलाइन आहेत, पण त्यातलं नेमकं कोणतं आपल्या कामाचं हेच कळत नाही.* ऑनलाइन मोफत असलेल्या गोष्टीतून नेमकं काय आणि कसं निवडावं हे ठरवण्यातच अनेकांचा वेळ जातो आहे.-असे अनेक प्रश्न शिक्षकांना पडले आहेत. जे रास्त आहेत. नव्यात जीव रमत नाही असं अनेकांना वाटूच शकतं.मात्र त्यासाठी काही गोष्टी करुन पाहता येतील.

त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आताचे प्रश्न सगळे एकदम सुटणार नाहीत. त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा.  उत्तर शोधा. मुख्य म्हणजे माहिती शोधू नका. डोण्ट गो फॉर द इन्फॉर्मेशन, गो फॉर द सोल्यूशन.आता ऑनलाइन शिकवायचं आहे तर आहे, त्यामुळे वास्तव मान्य करणं आणि तोडगे शोधणं या दिशेनं आपली नजर वळवली.तर उत्तर सापडतील.ती शोधण्यासाठीची काही सूत्रं. उद्याच्या अंकात.

( संदर्भ :ब्रिटिश कौन्सिल डॉट ओआरजी)