शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

फेसबुकवर शाळेचा वर्ग कधी  भरेल  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 17:27 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्दे शाळा खरंच ‘ऑनलाईन’ असू शकते का?

रणजितसिंह डेसले 

आज आपण ऑनलाईन शाळेच्या आणखी एका पद्धतीबद्दल जाणून घेवूयात. यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ंऐप च्या मदतीने कशा पद्धतीने शाळा भरते, हे  आपण पाहिले.  त्यातला अजून एक प्रकार म्हणजे सोशल मिडियावरून काही शिक्षक त्यांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने भरवतात. यासाठी ते यु ट्यूब लाइव्ह, किंवा फेसबुक चा वापर करत असतात. अशा शिक्षकांच्या वर्गात जगातील कोणताही विद्यार्थी सहभागी होवू शकतो. असे शिक्षक त्यांच्या वर्गाचे वेळापत्रक त्यांच्या सोशल मिडिया खात्यावरून अगोदरच जाहीर करतात. तुम्ही अशा शिक्षकांचे प्रोफाईल पाहून ते कोणकोणते विषय शिकवतात? कोणत्या वर्गाला शिकवतात, हीे माहिती करून घ्यायची. त्यांनी अगोदर शिकवलेल्या पाठांचे काही व्हिडिओ तिथे अपलोड केलेले असतात, ते पाहून जर तुम्हांला त्याची पद्धत आवडली तर मग तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वर्गात प्रवेश घेवू शकता.  

या पद्धतीचा एक फायदा असा कि अशा शिक्षकांनी शिकवलेल्या घटकाचे व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहून तो घटक समजून घेवू शकता. जसं  आपण आपल्या मोबाईलवर एखादा चित्रपट कसा वारंवार पाहतो, तसचं हे पाहता येत. पण मुलांनो, यामध्ये एक उणीव आहे. ती म्हणजे इथ शिक्षक आणि विद्यार्थी यांचा थेट संबंध येत नाही. इथल्या शिक्षकांना हे माहिती नसतं कि ते कोणत्या मुलांना शिकवत आहेत. साधारणपणो आपल्या वर्गातील मुलांची समज लक्षात घेवून आपले शिक्षक आपल्याला शिकवत असतात. इथे मात्र तसं घडत नाही.

आणि दुसरं म्हणजे इथे तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळायला तुम्हाला खूप वेळ लागतो, आता तुम्ही ठरवायचं कि कोणत्या प्रकारची ऑनलाईन शाळा तुम्हांला आवडेल.