लॉक डाऊन सुरु झाल्यापासून तुम्ही एक गोष्ट बघितली आहे का? आपल्या घराच्या आजूबाजूची कबुतरं कमी होऊन निरनिरळ्या रंगीबेरंगी पक्षी आपल्याला दिसायला लागले आहेत. सकाळी पक्षांचा आवाज ऐकू येतो. एरवी वाहनांच्या आवाजात पक्षांचे आवाजच आपल्याला ऐकू येत नाहीत. पण लॉक डाऊननंतर आपण माणसं घरात अडकल्याने पक्षांनाही मुक्तपणो फिरता येतंय. काही पक्षी मित्रंच्या म्हणण्यानुसार पक्षी नेहमीपेक्षा थोडे खालून आता उडताहेत. एरवी माणसांच्या भीतीने ते आभाळात उंच उंच उडत होते. पण आता तशी भीती सध्या तरी त्यांना राहिलेली नाही. गच्चीत किंवा खिडकीतून अचानक दिसणा?्या लहानमोठ्या आकाराच्या आणि विविध रंगांच्या पक्षांच्या जगाबद्दल आपल्याला माहिती मात्र नाहीये. कारण कुठल्यातरी अभयारण्यात ट्रीपला गेल्यावरच आपण पक्षी निरीक्षणाला जातो. पण आता आपल्याला आपल्या घरातून पक्षी निरीक्षणाची संधी मिळाली आहे. तर याचं सोनं करूया का?