अमेरिकेतल्या नासा या प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेची खास मुलांसाठीची वेबसाईट आहे नासा किड्स म्हणून. खूप इंटरेस्टिंग साईट आहे ही. या साईटवर तुम्ही गेलात तर इथे मुलांसाठी पुष्कळ गेम्स आहेत, सोप्या भाषेत नासा काय काय काम करतं याची माहिती आहे. मंगळावर नासा पहिल्यांदा गेलं त्याची गोष्ट आहे. इतकंच नाही तर 2020चं एक सुंदर कॅलेंडर आहे. यात जगभरातल्या मुलांनी त्यांना दिसणा?्या स्पेसवरची चित्र काढलेली आहेत. शिवाय ऍस्ट्रोनॉट्सची माहिती आहे. काही प्रसिद्ध अंतराळवीरांची नावं, फोटो आणि त्यांची कामगिरी यांची माहिती आहे. रॉकेट्स, स्पेस क्राफ्ट आणि स्पेस सूट्स कसे काम करतात हे तुम्हाला या कॅलेंडरमध्ये वाचायला मिळू शकतं.
nasa kids. https://www.nasa.gov/kidsclub/index.html